पाटे येथे विहीरीत पडून तीन हरणांचा मृत्यू

चांदवड (कीर्ती गुजराथी) –
पाण्याच्या शोधात असलेल्या तीन हरणांचा पाटे ता. चांदवड येथील जिभाऊ प्रभाकर चव्हाण या शेतकर्‍याच्या शेतातील विहीरीत पडून पाण्यात बडून मृत्यू झाल्याची घटना घडली.
शेतकरी जिभाऊ चव्हाण हे आपल्या शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी विहीरीत डोकावून पाहीले असता पाण्यावर तीन मृत हरणे तरंगत असल्याचे त्यांना आढळून आले. घटनेची माहिती त्यांनी तात्काळ चांदवड वनविभागाला दिली. वनविभागाचे वनपरिमंडळ अधिकारी वैभव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड वनरक्षक  एस. बी. मरशिवणे, वनसेवक भरत वाघ, ओम भोसकर व वाहनचालक अशोक शिंदे यांनी मृत हरणांना विहीरीबाहेर काढले. चांदवड वनविभागाच्या कार्यालयाजवळ त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
—————–
फोटो- पाटे येथे विहीरीत पडून मृत्यूमुखी पडलेली तीन हरणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *