चांदवड (कीर्ती गुजराथी)-
उच्च शिक्षण घेऊन स्वतः स्थिरस्थावर होऊन स्वावलंबी झाल्यानंतर मागे वळून पाहताना कधीकाळी आपणही कठीण परिस्थितीतून गेलेलो असल्याची जाणीव ठेवून आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो, या सामाजिक व उदात्त भावनेतून न्हनावे ता. चांदवड येथील अजिंक्य (कुणाल) ठाकरे आणि त्यांचे सहकारी योगेश कुवर चांदवड यांनी तालुक्यातील नारायणखेडे आणि दत्तवाडी (तळेगावरोही) या दोन जिल्हा परिषद शाळांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना मोफत साहित्याचे वाटप केले.
ग्रामीण तसेच आदिवासी पाडा, वाडा वस्तीवर अजूनही जिल्हा परिषदेतील शाळेच्या विद्यार्थ्यांकडे परिस्थिती अभावी पुरेसे शालेय साहित्य नसते. या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अडचणी येऊ नये या उदात्त हेतूने कुणाल ठाकरे यांनी सन २००८ पासून आत्तापर्यंत १४,५०० विद्यार्थ्यांना मोफत साहित्याचे वाटप तालुक्यात केलेले आहे. यामध्ये शालेय दप्तर, कंपास, वही, पेन इत्यादी समावेश असतो. कुणाल ठाकरे यांचा आदर्श घेऊन त्यांचे सहकारी योगेश कुवर आणि त्यांची पत्नी कविता कुवर यांनी त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस नारायणखेडे शाळेतील विद्यार्थ्यांसोबत मोफत साहित्य वाटप करून साजरा केला. यावेळी कुवर यांचे आई-वडील, बहीण, मेहुणे असा परिवार उपस्थित होता. येथे २९ विद्यार्थ्यांना मोफत साहित्याचे वाटप केले. तर दत्तवाडी (तळेगावरोही) येथे ३० विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटप केले. मुलांना शालेय साहित्य मिळाल्यामुळे निरागस मुलांच्या चेहर्यावर आनंदाचे भाव उमटले होते. यावेळी कुणाल ठाकरे, योगेश कुवर, रमेश कुवर, भूषण निकुंभ, सुनीता कुवर, कविता कुवर, सरपंच यादव गरुड, पत्रकार दसरथ ठोंबरे, विजय काळे, संजय काळे, रवींद्र काळे, वाहेगांव सरपंच सविता खैरे, पोलीस पाटील दीपक खैरे, विष्णू खैरनार, केशव खैरे, संदीप पवार, अकबर शेख, जिजाबाई खैरनार, रामदास खैरनार, संदीप खुरसने, संदीप खैरनार, अनिल खैरनार, गोरख सोनवणे, शिक्षक संजय कोकाटे, तळेगाव सरपंच भाऊसाहेब जिरे, अशोक गोरडे, बापूसाहेब भोकनळ, बाबाजी वाकचौरे, विकास पाटील, संतोष पाटील, राहुल हिरे, ज्ञानेश्वर हिरे, संतोष हिरे, संदीप हिरे, सागर शिंदे, नाना शिंदे, बबन वाकचौरे, पोपट वाकचौरे, सोमनाथ वाकचौरे, सुनील निंबाळकर, गोकुळ वाकचौरे, निलेश आहेर, एकनाथ रोकडे, सोमनाथ भोकनळ, शरद कदम, राजेंद्र खापरे, मंगेश भोकनळ, आशा गवळी, नागेश्वर बागुल, सविता केदारे, मनीषा पवार, शितल वाढणे, कविता पवार, वैशाली सोनवणे, माया माळी आदी उपस्थित होते.
——-
फोटो- नारायणखेडे येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना मोफत साहित्याचे वाटप करताना कुणाल ठाकरे, योगेश कुवर, सरपंच सविता खैरे आदी.

























