बीड: आंतरराष्ट्रीय शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची क्षितिजे विस्तारण्यासाठी तसेच मुलांना जर्मनी या देशात उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या हेतूने श्री भगवान इंग्लिश स्कूल , बीड येथे भाषा अकॅडमी ,पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने जर्मन भाषेच्या केंद्राचे व प्ले-झोन चे उद्घाटन माननीय जिल्हाधिकरी विवेक जॉन्सन सर यांच्या हस्ते दि. २२/७/२०२५ रोजी संपन्न झाले.
यावेळी साऊथ-अप्रिâकेत पार पडलेल्या बहुप्रतीष्ठीत कॉम्रेड मॅरॅथोन स्पर्धेत बीड जिल्ह्यातील सहभागी डॉ. संजय जानवळे व हरी ठोंबरे सर यांचा सत्कार देखील माननीय जिल्हाधिकरी विवेक जॉन्सन सर यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी डॉ. अनिल सानप सर , पागे सर , सी.आर.पटेल सर , दादासाहेब मुंडे सर , दत्ता देशमुख सर , प्रतिक कांबळे सर , सोमनाथ खताळ सर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी संस्थेचे पदाधिकारी डॉ.राजीव घुगे सर, डॉ. सौ संध्याताई घुगे मॅडम, डॉ. तेजस्विनी घुगे मॅडम,शाळेच्या प्राचार्या श्रीमती बांगर मॅडम ,भगवान इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य पंडित मॅडम तसेच शाळेतील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी ,पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना माननीय जिल्हाधिकरी विवेक जॉन्सन सर म्हणाले ‘ बीड सारख्या शहरात जर्मन भाषा शिकण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे ही वाखाण्याजोगी बाब आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील आयुष्यात नक्कीच होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला व त्यांचे स्वतःचे अनुभव सांगत विद्यार्थ्यांनी खेळाचे महत्व जाणून खेळाडू वृत्ती जोपासली पाहिजे असे नमूद केले तसेच श्री भगवान इंग्लिश स्कूल बीड नी जर्मन भाषा शिकण्याची संधी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली त्यासाठी शाळेचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
भाषा अकॅडमी चे संचालक पागे सर यांनी जर्मन भाषा शिकल्यावर जर्मन देशातील उपलब्ध होणार्या संधी विषयी मार्गदर्शन केले. डॉ. जानवळे सर यांनी त्यांच्या कॉम्रेड मॅरॅथोन स्पर्धेतील अनुभव सांगताना विद्यार्थ्यांना आयुष्यात प्रयत्न व सातत्य ठेवल्यास कुठलीच गोष्ट अशक्य नाही असे सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फराह सय्यद व तेजस सानप यांनी केले. डॉ.तेजस्विनी घुगे मॅडम यांनी सर्वांचे आभार मानून कार्याक्रमाची सांगता केली. कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन श्री भगवान इंग्लिश स्कूलच्या सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी व्यवस्थित पार पाडले
श्री भगवान इंग्लिश स्कूल मध्ये जर्मन भाषेचे केंद्र व प्ले-झोन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते संपन्न….!!!

























