तालुका प्रतिनिधी : गोपाळकुमार कळसकरभुसावळ : वावडदा ( तालुका जळगांव) येथील सरपंच एड. राजेश वाडेकर सर यांच्यावर अनियमित प्रशासकीय कार्य केल्याचे आरोप होते. परंतु उच्च न्यायालयाने सदर आरोप निष्कासित करून राजेश वाडेकर सर निर्दोष असल्याचा निकाल दिला. त्यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे एड. राजेश वाडेकर यांची वावडदे ग्रुप ग्रामपंचायत सरपंचपदी पुन्हा नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे ९ जुलै रोजी चर्मकार विकास संघ जळगाव यांच्यातर्फे त्यांचा हृदय सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी चर्मकार विकास संघाचे अध्यक्ष एड.अर्जुन भारुळे यांच्या हस्ते शाल,पुष्पगुच्छ देऊन वाडेकर सर यांचा सत्कार करण्यात आला व त्यांचे मनोबल वाढवण्यात आले. या प्रसंगी भुसावळचे समाजसेवक प्रमोद सावकारे यांनी त्यांचे अभिनंदन केले. संजय भटकर सर, संजय वानखेडे सर,प्रा.धनराज भारुळे यांनी राजेश वाडेकर यांनी गावच्या विकासासाठी केलेल्या विविध समाजपयोगी कार्याची तसेच त्यांनी राबविलेल्या विविध शासकीय उपक्रमांची माहिती दिली. तसेच त्यांच्या विधायक कार्याचे कौतुक केले . पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी चर्मकार विकास संघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य विश्वनाथभाऊ सावकारे, संजय वानखेडे सर, संजय भटकर सर, मनोजभाऊ सोनवणे, एड.श्री.अर्जुन भारुळे, प्रा.श्री.धनराज भारुळे श्री.काशीनाथ इंगळे, बाळकृष्ण खिरोळे,प्रा.संदीप शेकोकार,श्री. कमलाकर ठोसर, प्रकाश रोजतकर, रतीराम सावकारे, अविनाश वानखेडे , संदीप ठोसर सर, प्रा. विठ्ठलराव सावकारे, शिवदास कळसकर,सीताराम राखुंडे, अनिल अहिरे सर, गणेश काकडे , राजेंद्र शिंदे, संजय राजपूत, भिकाभाऊ राजपूत, प्रदीप तेली,विजय राखुंडे ,लिलाधर भारुळे, ज्ञानदेव भारुडे, युवराज वानखेडे, पंकज भारुळे, आदि उपस्थित होते. या प्रसंगी सत्कारमूर्ती ?ड.राजेश वाडेकर सर यांनी समाजबांधवांनी केलेल्या अनमोल सहकार्याबद्दल ऋण व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यशवंत वानखेडे, दीपक कळसकर, पंकज भारुळे ,कमलेश वाढे यांनी परिश्रम घेतले.
वावडदा सरपंचपदी एड.राजेश वाडेकर यांची फेरनिवृत्ती


























