लासलगाव : पिंपळगाव बसवंत येथील लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँकेच्या शाखेचा १२वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या मंगलमयी सोहळ्याचे औचित्य साधून बँकेच्या सन २०२६ च्या नवीन दिनदर्शिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. शांतारामतात्या बनकर, भास्करराव बनकर, गणेश बनकर,सुहास मोरे आणि ज्येष्ठ सभासद भालचंद्र रसाळ उपस्थित होते.
या प्रसंगी कार्यक्रमात बँकेचे संचालक लक्ष्मण मापारी, जनार्दन जगताप, सुभाष रोटे, अरुण शिंदे, संदीप दरेकर, दशरथ आहेर, सोपान वाघ आणि पंडित गिते यांच्या शुभहस्ते बँकेच्या आगामी वर्षाच्या दिनदर्शिकेचे अनावरण करण्यात आले.
या सोहळ्याला गणेश बनकर, सुहास मोरे, संत सावता पतसंस्थेचे खोडे साहेब, देशमाने, ज्येष्ठ सभासद भालचंद्र रसाळ यांच्यासह साहेबराव गवंदे, विष्णू गवंदे, डॉ. बाळासाहेब जाधव, सखाराम वाटपाडे, खंडेराव वाळुंज, दत्तू वैद्य, बाबुराव नाठे, समाधान साठे, दौलत गडाख, जनक देशमाने व सौ. देशमाने आणि विविध क्षेत्रातील मान्यवर व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतानाच ग्राहकांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. बँकेच्या वतीने RuPay डेबिट कार्ड सुविधेसह सर्व बँकांच्या एटीएममधून पैसे काढण्याची सोय, ऑनलाईन खरेदी, तिकीट बुकिंग आणि जन-धनसह इतर शासकीय योजनांचे लाभ ग्राहकांना दिले जात आहेत. तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ महात्मा फुले महामंडळ, विश्वकर्मा योजना आणि प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना अशा केंद्र व राज्य शासनाच्या व्याज परतावा अशा विविध योजनांचा लाभही बँकेमार्फत प्रभावीपणे राबविला जात आहे.
कार्यक्रमादरम्यान अॅडिशनल जनरल मॅनेजर शंतनू पाटील यांनी ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती देताना सांगितले की. बँकेच्या वतीने लवकरच युपीआय (UPI) सुविधा सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले, ज्यामुळे ग्राहकांना डिजिटल व्यवहार करणे अधिक सोपे होणार आहे. बँकेच्या वतीने अल्प व्याजदरात सोनेतारण कर्ज, गृहकर्ज, तात्काळ वैयक्तिक कर्ज आणि वाहन कर्ज यांसारख्या सुविधा कमीत कमी कागदपत्रांमध्ये उपलब्ध करून दिल्या जात असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाखाधिकारी धनंजय पानगव्हाने, गांगुर्डे, मणियार, कुंभार्डे, जाधव, राहुल गडाख, गंगावणे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी धात्रक, युगेंद्र प्रयागे, दिलीप कुमार रासकर, कल्याण देशमुख, विनायक काळदाते, ज्ञानेश्वर जाधव, शुभम निलख, सुनील खताळे, सचिन टोपे, आणि नाशिक व निफाड शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.


























