मातेरेवाडी .( दिंडोरी )
मातेरेवाडी येथील नूतन इंग्लिश स्कूल आज एक अभिमानस्पद क्षण अनुभवन्यास मिळाला शाळेचा होतकरू विद्यार्थी दत्तू शिवाजी झुरडे याने भारतीय सैन्यात निवड होऊन संपूर्ण विद्यालयाला आणि गावाला अभिमानास्पद कामगिरी केली आहे या निमित्ताने विद्यालयाच्या वतीन एक विशेष सत्कार समारभ आयोजीत करण्यात आला.
या या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे शालेय समिती अध्यक्ष मोहनराव काशिनाथ जाधव, समवेत सागर दादा गटकळ , हर्षल रेहरे ,मुख्याध्यापिका गांगुर्डे .के पी, ज्येष्ठ शिक्षक श्री भवर सर ,श्री तिडके सर ,श्री गायकवाड सर ,श्री भरम भरसट, सर श्री सोनवणे सर ,तसेच महिला शिक्षक भगिनी आणि विद्यार्थी उपस्थित होते .
यावेळी दत्तू झुरडे याने आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, त्याला लहानपणापासूनच सैन्यात भरती होण्याची इच्छा होती. शाळेतील शिक्षकांनी दिलेले मार्गदर्शन आणि पालकांचे पाठबळ यामुळे हे स्वप्न पूर्ण झाले.
समारोप करताना शालेय समिती अध्यक्षमोहन जाधव,सागर दादा गटकळ,मुख्याध्यापक यांच्या हस्ते विद्यार्थ्याचे शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमातून इतर विद्यार्थ्यांनाही देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाली, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


























