आष्टी मतदार संघातील पाटोद्यात अहिल्यानगर ते बीड पाटोदा हद्दीतील रस्त्याच्या कामात सरास मातीचा वापर?

अहिल्यानगर ते बीड पाटोदा हद्दीतील सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात सरास मातीचा वापर केल्याची गंभीर तक्रार नागरिकांकडून पुढे येत आहे. लाखो रुपयांचा खर्च असलेल्या या रस्त्यावर निकृष्ट साहित्य वापरून काम उरकले जात असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर थेट परिणाम होत असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.रस्त्याचे काम मजबुत आणि टिकाऊ व्हावे ही सर्वांची अपेक्षा असताना सरास माती टाकून औपचारिकता केल्याचा आरोप होत आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित गुत्तेदार व अधिकाऱ्यांवर चौकशी करून तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.नागरिकांचे स्पष्ट मत — “विकास हवा, बोगस काम नव्हे!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *