उच्च शिक्षित मुली झाले लग्न अवघड; संस्कार धर्मापेक्षा विवाह बाबतीत समाजक्रांती केव्हा

शहरात रहाणार्‍या एका टिपिकल, मध्यम वर्गीय,कुटुंबांत जन्मलेली चिमणी लहानपणापासुनच अभ्यासात खूप हुषार.घरात आई वडील दोघेही नोकरी करणारे व एक मोठा भाऊ.भाऊ बी.कॉम. झाला व एका को ऑपरेटीव्ह बँकेत नोकरीला लागला.
चिमणी हुशार म्हणुन इंजिनीयरींगला गेली. बी.ई. कॉम्प्युटर झाली. कॅम्पसमधेच तिला चांगले ७ लाखांचे पॅकेज मिळाले व वयाच्या बाविसाव्या वर्षी तिचा जॉब सुरु झाला तिचे आई वडील व भाऊ या तिघांच्या पगाराची बेरीज सुद्धा एवढी येत नव्हती त्यामुळे साहजिकच अरमान सातवे आसमान तक पहुंच गये थे. आता तिच्यासाठी वर संशोधन सुरू झाले.
मुलगा न्यूक्लियर फॅमिलीतला, वेल सेटल्डच हवा,इंजिनीयरच हवा,आय.टी.किंवा सॉफ्टवेअर मधलाच हवा याच अटींवर ( व मुलाचे आईवडील सोबत नको ही सुप्त अट ) मुले बघायला सुरवात झाली.
सुरूवातीलाच एक स्थळ आले ते त्यांच्या ‘च’ च्या अटींमधे फिट्ट बसणारे होते. मुलगा एकुलता एक,आयटी इंजिनीयर,१० लाखांचे पॅकेज, देखणा,रुबाबदार व वेलसेटल्ड होता.आई वडील गावी रहाणारे भरपूर शेतीवाडी म्हणजे त्याची पण अडचण नव्हती.
पण…..
मुलाचे वय होते २८ तर मुलीचे वय २३.वयामधे ५ वर्षांचे अंतर.चिमणीच्या आईला हे वयातील अंतर जास्त वाटले.तिच्या मते मुलाच्या व मुलीच्या वयामधे ‘ २ ते ३ वर्षांपेक्षा जास्त अंतर नको’ तसेच आत्ता तर सुरूवात केली आहे मिळतील याहून चांगले असा विचार करून ‘क्षमस्व’ म्हणुन मुलाला नकार कळवण्यात आला.
सुरुवातीलाच एवढे चांगले स्थळ चालून आल्याने व भरपूर चॉइस समोर दिसत असल्यामुळे अपेक्षा आणखीन वाढल्या. मुलगी बी.ई. आहे एवढा पगार आहे तर मुलगा वेल एस्टॅब्लिश व तिच्यापेक्षा जास्त शिकलेला हवा.नवर्‍याचे शिक्षण व पगार हे बायकोपेक्षा जास्त असले पाहिजे असे चिमणीच्या आईला वाटू लागले त्यामुळे मुलगा एम.ई.,एम.टेक. एम.एस. किंवा पी. एचडी. झालेलाच असला पाहिजे अशी नवीन अट लागू झाली.आता या कॅटेगरीतली बहुसंख्य मुले वयाने जास्त,चष्मा लावणारी,टक्कल पडु लागलेली अशी होती.जी सुयोग्य मुलं या कॅटेगरीत बसत होती त्यांच्याही काही अपेक्षा होत्या व त्यांना याहून उत्तम स्थळे चालून येत असल्यामुळे ते चिमणीला नापसंत करत. त्यामुळे जी मुले चिमणीला पसंत पडत त्यांना चिमणी पसंत पडत नसे,आणि ज्या मुलांना चिमणी पसंत पडत असे ती मुले चिमणीला पसंत पडत नसत असा खेळ सुरू झाला.
बघता बघता या खेळात चार पाच वर्षे गेली चिमणीचे वय वाढत चालले.त्यामुळे थोडे कॉंप्रोमाईज करुन ‘ बी. ई. ला बी. ई. चालेल’ अशी अट शिथील करण्यात आली. पण पाच सहा वर्षांच्या जॉबमधे चिमणीचे पॅकेज चांगलेच वाढले होते.सांगुन येणार्‍या मुलांचे पॅकेज त्यापेक्षा कमी होते.चिमणीच्या आईच्या हो हो आईच्याच अटीत ती मुले बसत नव्हती.
बिझनेस करणारी व चिमणीपेक्षा जास्त कमावणारी मुले सांगुन आली. पण बिझनेस करत असल्याने जॉइन्ट फॅमिली होती.मुलीच्या संसारात आईवडिलांची व बाकीच्यांची अडचण नको हा सुप्त हेतू मनात असल्याने नोकरीवालाच पाहिजे हे कारण सांगून नकार कळवण्यात आला.
चिमणीचे वय २९ झाले आणि एक मोठ्ठा टर्निंग पॉइंट आला. चिमणीच्या भावाचे लग्न झाले. चिमणीलाही कंपनीने सहा महिने प्रोजेक्टसाठी अमेरिकेला पाठवले.परत आल्यावर नाही म्हटल तरी मिळत असलेला पगार,परदेशवारी मुळे आलेला मीपणा व नणंद भावजयीच्या नात्यातील पूर्वापार चालत आलेले प्रेम यामुळे घरात रोज कटकटी सुरू झाल्या त्यामुळे ती काही वर्षे पुन्हा परदेशी गेली.
आणखीन काही वर्षे गेली….
आता चिमणी तेहतीस वर्षांची झाली असून प्रौढ दिसु लागली आहे.वरसंशोधन सुरूच आहे पण आता समस्या अशी आहे की पस्तीशीतील बहुतेक मुले डायव्होर्स झालेली,काहीतरी प्रॉब्लेम असणारी किंवा काही वाईट व्यसने असलेली आहेत.
आता अटी बर्‍याच शिथील झाल्या आहेत….
आता कोणताही मुलगा चालेल बी.ई.ऐवजी एमसीए किंवा एमसीएम असला तरी चालेल.
त्याचा पगार कमी असला तरी हरकत नाही.,
बट…स्टील देअर ईज नो लक !
आता चिमणीच्या आईवडिलांनी ज्योतिषांचे ऊंबरठे झिजवायला सुरवात केली आहे.भरपूर पैसे खर्च करून सगळ्या प्रख्यात ज्योतिषांना चिमणीची पत्रिका दाखवुन झाली आहे. प्रत्येक ज्योतिष्यांनी सांगितलेले उपाय शांती व खडे वापरून झाले आहेत.
बट…. स्टिल देअर इज नो लक
चिमणीने स्वतःचे लग्न स्वतः ठरवावे म्हणुनही स्वातंत्र्य देऊन झाले पण लव्ह मॅरेज करण्याचे धाडस चिमणीत नाही.अजुनही चिमणीसाठी मुले पहाणे चालुच आहे.
चिमणी आता ४० वर्षांची झाली आहे.तिच्याजवळ स्वतःचे सुंदर घर,गाडी व भरपूर बॅन्क बॅलन्स आहे.पण आयुष्य नासलय. काळजी करणारे कोणीही मायेचे माणूस जवळ नाही.
वैराण झालय आयुष्य.
आता आई वडील पण वयोमाना नुसार थकलेत.
( मुलीच्या संसारात सासू सासरे नको म्हणणार्‍या आईला सूनच सांभाळत आहे. )
चिमणी एकटी पडलीय…
कोण चुकले…
चिमणी ?
चिमणीचे वडील ?
चिमणीची आई ?
अपेक्षा व अटींचा हा खेळ सध्या अनेक चिमण्यांच्या आयुष्यात चालू आहे. विशेषतः उच्चशिक्षीत कुटुंबामधे अशा चिमण्यांची संख्या वाढत चालली आहे
ज्यांना फक्त मुलीच आहेत त्यांनी सुद्धा हे लक्षात ठेवावे की आपण मुलींना आयुष्यभर पुरणार नाही आपल्यानंतर तिला कोणाचाही आधार असणार नाही त्यामुळे य्ाोग्य वयात लग्न होणं गरजेचं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *