मंठा:ज्ञानेश्वर पवार
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा अंभोडा कदम केंद्र पांगरी बु.ता.मंठा जिल्हा जालना येथे आज दि. 17 डिसेंबर रोजी आदरणी मनोजकुमार जक्केवाड यांनी प्रत्यक्ष विद्यार्थी यांना अशा ई.स.पूर्व शिवकालीन, नाणी नोटा, तिकीट प्रदर्शन दाखवले प्रदर्शनांमुळे नव्या पिढीमध्ये इतिहासाविषयी कुतूहल व अभिमान निर्माण होतो.इतिहास म्हणजे फक्त पुस्तके नाहीत, तर नाणी, नोटा व तिकीट हीदेखील आपल्या वैभवशाली भूतकाळाची जिवंत साक्ष आहेत.
या प्रदर्शनामध्ये ई.स.पूर्व काळापासून शिवकालीन काळापर्यंत वापरात असलेली विविध नाणी, जुन्या नोटा व दुर्मिळ तिकीट पाहण्याची अनोखी संधी उपलब्ध होते.
🔸 प्रदर्शनाची वैशिष्ट्ये :
🪙 ई.स.पूर्व काळातील प्राचीन नाणी
🪙 शिवकालीन चलन व नाण्यांची माहिती
💵 जुन्या काळातील नोटांचा इतिहास
🎟️ प्रवास व इतर वापरातील जुनी तिकीट
📜 प्रत्येक वस्तूसोबत ऐतिहासिक माहिती
🔹 या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना व नागरिकांना
✔ इतिहासाची प्रत्यक्ष ओळख
✔ चलनव्यवस्थेचा विकास
✔ शिवकालीन स्वराज्याचे आर्थिक सामर्थ्य
✔ वारसा जतन करण्याची जाणीव
📌 आपला इतिहास – आपली ओळख करून देणारे हे नाणी नोटा च्या प्रदर्शनाने शाळेतील विद्यार्थी व गावातील नागरिक यांना बरच काही शिकायला मिळाले आहे.
सदरील प्रदर्शनास उपस्थित नवनाथ व्हावळे शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय राऊतवाड विरगव्हाण तांडा शाळेचे मुख्याध्यापक शशिकांत जोशी व त्यांच्या शाळेतील विद्यार्थी,समिती सदस्य शिक्षण प्रेमी ज्ञानेश्वर पवार,पालक दिलीप चव्हाण शाळेतील प्राथमिक पदवीधर भीमराव खरात जेष्ठ सहशिक्षक राजेश चव्हाण,बालाजी नरवाड गणेश कुरे,छगन रुपनर,विठ्ठल नाईक आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
*अंभोडा कदम येथे ई.स.पूर्व शिवकालीन, नाणी नोटा, तिकीट पाहण्यासाठी भरले प्रदर्शन*


























