स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच अमळनेर जिल्हा परिषद गटात ‘भाऊसाहेब भवर’ यांच्या नावाची जोरदार चर्चा

पाटोदा (गणेश शेवाळे) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होताच अमळनेर जिल्हा परिषद गटात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर मतदारसंघात सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे सामाजिक कार्यातून व ग्रामविकासाच्या धडपडीत नेहमी आघाडीवर असलेले भाऊसाहेब आण्णा भवर.गेल्या काही वर्षांपासून सातत्याने ग्रामीण भागातील प्रश्न सोडविणे, शेतकऱ्यांच्या अडचणींवर आवाज उठविणे, तरुणांना रोजगाराभिमुख उपक्रमात सहभागी करून घेणे यामुळे त्यांची लोकप्रियता वाढत चालली आहे. परिणामी, निवडणुकीचे बिगुल वाजताच कार्यकर्त्यांपासून ते सर्वसामान्य मतदारांपर्यंत “गटात भाऊसाहेब आण्णाच नाव जोरदार चर्चेत आहे” अशा चर्चा रंगताना दिसत आहेत. ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद अशा सर्व स्तरांवर कार्यकर्त्यांची चांगली ताकद असलेल्या भाऊसाहेब भवर यांना स्थानिक पातळीवर मजबूत जनाधार आहे. त्यामुळे गटात इतर इच्छुक उमेदवारांची धडपड सुरू असली तरी जनतेच्या मनातील पसंतीची मुहर मात्र भाऊसाहेब भवर यांच्याच नावावर दिसते आहे.काही दिवसांत पक्षीय समीकरणे आणि अधिकृत उमेदवारीचे गणित स्पष्ट होणार असले तरी, सध्या तरी अमळनेर गटात भाऊसाहेब आण्णा भवर यांच्या नावाचीच जोरदार चर्चा रंगत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *