लासलगावला पोळ्याचा सन मोठ्या उत्साहात साजरा.

लासलगाव(आसिफ पठाण)
लासलगाव येथे शुक्रवारी बैलपोळा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला.  सकाळ पासूनच मातीची बैले व बैलांना सजवण्यासाठी साहित्य असणाऱ्या दुकानांवर गर्दी दिसून येत होती.मातीच्या बैलाच्या लहान मूर्ती लहान मुलांसाठी खास आकर्षण असतात. यामुळे परिसरातील नागरिक आपल्या लहान मुलांसह बाजारातुन मातीची बैलजोडी खरेदी करत होते.श्रावणी पोळ्यानिमित्त बैलांना अंघोळ घालुन अंगावर झुल घातली.विधीवत पूजा करून बैलांना पुरणपोळीचा घास भरवण्यात आला.शिगांना रंग व फुगे बाधूंन गुलाल भडाऱ्यांची उधळण करीत बैलांची पारंपारिक वाद्यांच्या गजरात लासलगाव च्या मेनरोड वरून मिरवणूक काढण्यात आली
शेतकर्‍याचा सखा, मित्र सर्जा-राजाचा पोळ्याचा दिवस मानाचा असतो. पोळ्याच्या दिवशी बैलाला गाडीला अथवा नांगराला जुंपले जात नाही तर त्याचे पूजन केले जाते. पोळ्याच्या पहाटे शेतकरी आपल्याबैलांना नदीवर व विहिरी वर नेऊन त्यांची आंघोळ घातली . त्यांच्या अंगाला हिंगूळ लावले.शिंगाला रंग लावून त्याच्या अंगावर झुल टाकली,गळ्यात सुतापासून तयार करण्यात आलेल्या माळा तर पायात घुंगरू बांधले. अशा नाना तर्‍हेने बैलांना सजविण्यात आले.
शेतकर्‍याच्या घरी बैलांचे स्वागत करण्यासाठी सुवासिनी सडा रांगोळ्या काढल्या तर घरात चुलीवर लाडक्या पाहुण्यासाठी खरपूस पुरणपोळी तयारकेली.वस्तीवर बैलाला आमंत्रित करण्यासाठी शेतकरी सपत्‍नीक वाजत गाजत जातात व त्याला ‘अतिथी देवोभवो’ प्रमाणे घरी आणतात . घरातील सुहासिनी बैलांची विधीवत पूजन करून त्यांना पुरण पोळीचा नैवेद्य दिले.त्यासोबत त्यांच्या पुढे गहू-ज्वारीचे दान केले.या रोजी गावातील इतर घरातून ही बैलांना जेवणासाठी आमंत्रित केले जाते . शेतकर्‍याला औक्षण करून त्याला नारळ दिले  तर बैलांना पुरणपोळीचे जेवण दिले गळ्यात कवड्या व घुंगुरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा  शिंगांना बेगड,डोक्याला बाशिंग,मथोठ्याचे पाठीवर सुरेख नक्षिकाम केलेली झुल असते.
लासलगाव सह पिंपळगाव नजीक मध्ये तसेच टाकळी( विंचूर)ब्रम्हणगाव (विंचुर) निमगाव वाकडा,कोटमगाव खडक माळेगाव खानगाव या भागात उत्साहात पोळा सण साजरा करण्यात आला.त्यांनतर गावातून बैलांची सवाद्य मिरवणूक काढली गेली
अशा पारंपारिक पध्दतीने मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात शेतकर्‍याचा जिव्हाळ्याचा सण पारंपारिक पोळा साजरा केला गेला..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *