मातीच्या गणेश मुर्तींना प्राधान्य द्या – आकाश पगार

नाशिक (आसिफ पठाण) :- ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्ती, त्यावर केलेले रासायनिक रंगकाम व इतर सौंदर्यप्रसाधंनामुळे गोदावरी नदी व इतर जलाशयांचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. हे प्रदूषण थांबविण्यासाठी नाशिककरांनी मातीच्या गणेश मुर्तींना प्राधान्य द्यावे असे आवाहन “देव द्या, देवपण घ्या !” या उपक्रमाचे संयोजक आकाश पगार यांनी केले आहे.

सुविचार मंच व विद्यार्थी कृती समिती या संस्थेंच्या माध्यमातून गेल्या १४ वर्षांपासून “देव द्या, देवपण घ्या !” हा उपक्रम राबविण्यात येतो. यंदाचे या उपक्रमाचे पंधरावे वर्ष आहे. दरवर्षी नाशिककरांकडून संकलित केलेल्या लाखो गणेश मूर्ती नाशिक महानगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात येतात.

‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’ हे अनेक महिने पाण्यात विरघळत नाही. त्यामुळे प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा गाळ नदी व अन्य जलाशयाच्या तळाशी साचतो त्यामुळे नदीतील पाण्याचे जिवंत झरे बंद होण्याची शक्यता असते. प्लॅस्टर ऑफ परिसच्या मुर्तीवरील रासायनिक रंगामुळे मासे व इतर जलचरांना धोका निर्माण होतो तसेच पाण्याच्या गुणवत्तेला देखील हानी पोहचते. त्यामुळे गणेशोत्सवात गणपतीच्या पुजेसाठी व पर्यावरणासाठी उपयुक्त अशा मातीच्या मुर्तींना नाशिककरांनी प्राधान्य द्यावे असे आवाहन ‘देव द्या, देवपण घ्या !’ या उपक्रमाचे संयोजक आकाश पगार यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात केले आहे.
गणेशोत्सवातील १० दिवस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व घरोघरी जाऊन विद्यार्थी कृती समितीच्या कार्यकर्त्यांकडून पीओपीच्या गणेशमूर्ती नदीपात्रात विसर्जित न करता दान करावे अशी जनजागृती करणारी पत्रके वाटली जातात. नाशिकचे गोदाप्रेमी भाविक या आवाहनाला दरवर्षी भरभरून पाठिंबा देत आहेत. गेली १४ वर्षे सातत्याने हा उपक्रम राबविला जात असल्याने दिड, पाच व सात दिवसांच्या गणेशोत्सवातील मूर्ती देखील स्वीकारण्यात येतात.

दरवर्षा प्रमाणे यंदा देखील अनंत चतुर्दशीच्या दिवशी चोपडा लॉन्स जवळील गोदापार्क येथे सकाळी ९ ते २ या वेळेत “देव द्या, देवपण घ्या” उपक्रमाचे कार्यकर्ते मूर्ती स्विकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी आकाश पगार, विशाल गांगुर्डे, सागर बाविस्कर, वैष्णवी जोशी, राहुल मकवाना, जयंत सोनवणे, जयश्री नंदवानी, तुषार गायकवाड, गौरी घाटोळ, कुणाल सानप, भाग्यश्री जाधव, सोनू जाधव, दुर्गा गुप्ता, ललित पिंगळे, योगेश निमसे, प्रणाली शिंदे, मदन म्हैसधुणे, संकेत निमसे, सुजित सोनवणे, दिपाली जाधव, स्मिता शिंदे, प्रसाद हिरे, अविनाश बरबडे, सागर दरेकर, संदिप उफाडे, स्नेहा आहेर, सिद्धार्थ दराडे, महेश मंडाले, वैभव बारहाते, आकाश खरे, अक्षय नेर, अमोल भांड, राहुल घोडे, रोहित कळमकर, शुभम पगार, जीत मोरे, विकास ओढेकर, अश्विन बोडके, राहुल पवार, हरी चौधरी, युवराज कुरकुरे, दिगंबर काकड, मंगेश जाधव, गीतांजली पवार, श्रेया सोनवणे, सानिया पगार, भावेश पवार, योगेश माळोदे, किशोर वाघ, रोहित जाधव आदी परिश्रम घेत आहेत.

 

फोटो – आकाश पगार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *