दिंडोरी मनसे तर्फे कार्यकर्ता मेळावा :तालुका अध्यक्ष नामदेव गावित

दिंडोरी (कृष्णा गायकवाड- ) सामाजिक न्यायिक जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेने च्या माध्यमातून संघटित कार्यवाहीसाठी एकत्र येण्याची गरज. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिंडोरी तालुका अध्यक्ष श्री नामदेव गावित यांच्यावतीने सोमवार दिनांक १९/८/२०२५ रोजी दिंडोरी येथे म.न.से भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे तरी सर्व सामाजिक न्यायासाठी लढणारे कार्यकर्त्यांनी जमा होण्याचे आवाहन यावेळी श्री नामदेव गावित यांच्याकडून करण्यात आले.

 

दिंडोरी तालुक्यातील सर्व सामाजिक न्यायासाठी लढणारे मनसे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते व जनतेचे प्रतिनिधी
जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी म.न.से च्या माध्यमातून संघटित कार्यवाहीसाठी एकत्र येण्याची गरज…

मित्रांनो, दिनांक १९ / ८ / २०२५ दिंडोरी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक
दिंडोरी तालुक्यातील सामान्य जनतेसमोर शासकीय कार्यालये, ग्रामपंचायती, तहसील कार्यालय, पोलीस ठाणे, बँका आदी ठिकाणी अनेक समस्या उभ्या आहेत. या अडचणी सोडवण्यासाठी एकट्याने लढून फारसा परिणाम होत नाही, याची आपल्याला जाणीव आहे.
म्हणूनच आपल्याला आता एकत्र येऊन, संघटितपणे आणि पक्षाच्या माध्यमातून लढा द्यावा लागणार आहे.

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे एक असे व्यासपीठ आहे जे सामान्य जनतेचा आवाज बनून लढण्याची तयारी ठेवते.
आपण फक्त म न.से चे विद्यमान कार्यकर्तेच नव्हे, तर इतर सामाजिक संघटनांमध्ये काम करणारे सर्व सक्रिय कार्यकर्ते – तुम्हालाही आम्ही साद घालतो. या पक्षाच्या माध्यमातून एकसंघपणे काम करू या. आपल्या सामाजिक कार्याला अधिक परिणामकारक दिशा देऊ या.

प्रत्येक गावात एक सजग व निडर कार्यकर्ता घडवणे हे आपले ध्येय असले पाहिजे, जो गावातील जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेईल व मनसेच्या माध्यमातून न्याय मिळवून देईल.
दिंडोरी तालुक्यातील म. न.से कार्यकर्त्यांचा व नव्याने सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांचा एक भव्य मेळावा लवकरच आयोजित करण्यात येत आहे.
या महत्त्वपूर्ण मेळाव्यास आपण सर्वांनी मोठ्या संख्येने, उत्स्फूर्तपणे उपस्थित राहावे, ही नम्र विनंती.

असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिंडोरी तालुका अध्यक्ष नामदेव गावित यानी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *