बीड प्रतिनिधी
साहित्यिक, लेखक,कवी म्हणून सर्व दूर सु परिचित असणारे उद्धव भयवाळ आपल्या वयाच्या 70 वर्ष चालू असतानाही पहिल्यापासूनच आपण लेखन शैली व साहित्यिकात अतिशय मार्मिक पद्धतीने विविध विषयावर त्यांचे लेखन झालेले आहे विविध कार्यक्रमात सहभागी विविध विषयावर विवेचन अशा प्रकारे त्यांचं कार्य चालू आहे आणि 28 जुलै रोजी “बालसाहित्य संस्थान, दरबारीनगर, अलमोडा उत्तराखंड यांच्यामार्फत आयोजित अखिल भारतीय ऑनलाईन हिंदी कवी संमेलनात छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी रहिवासी असणारे ज्येष्ठ साहित्यिक उद्धव भयवाळ यांना मुख्य अतिथी पदाचा बहुमान या कार्यक्रमात मिळाला.
या कवी संमेलनात देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमधून 25 पेक्षा जास्त कवी सहभागी झाले होते.
भयवाळ यांच्या निवडीचे सर्व स्तरातून आप्तेष्ट,नातेवाईक, मित्रपरिवार, लेखक ,कवियत्री यांच्याकडून अभिनंदन वर्षाव पडत आहेत.






















