भोकरदन, ता. २(श्री महेंद्र बेराड सर) : तालुक्यातील पारध बु. येथे राजर्षी शाहू महाराज
यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येणार असल्याची माहिती
आमदार संतोष दानवे यांनी दिली. गुरुवारी (ता. ३१) मुंबई येथे मंत्रालयात यासंदर्भात ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. आमदार संतोष दानवे, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे कार्यवाह सुधीर थोरात, इतिहास संशोधक श्री रवींद्र सासमकर यांची उपस्थिती होती.
असे असेल स्मारक :-
■ रायगड किल्ल्याची थ्रीडी प्रतिकृती
■ शिवछत्रपती दालन शस्त्र दालन
■ ऑडिओ-व्हिज्युअल शो
बैठकीत शाहू महाराज यांचे
राष्ट्रीय स्मारक उभारण्यात यावे, अशी संकल्पना शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे आमदार संतोष दानवे आणि स्वयम सामाजिक संस्था यांनी मांडली होती.
दरम्यान, राजर्षी शाहू महाराज यांचे बराच काळ वास्तव्य पारध
बु. येथे होते. छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या चरित्राची ओळख भावी पिढीला व्हावी आणि त्यांना राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळावी. यासाठी शाहू महाराज यांचे राष्ट्रीय स्मारक पारध या ठिकाणी उभारण्यात यावे अशी आग्रही मागणी आमदार संतोष दानवे यांनी केली. त्यांच्या मागणीस ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मुख्य कार्यकारी अधिकारी, जालना यांना तात्काळ कृती आराखडा तयार करून शासनास मंजुरीस्तव सादर करण्याच्या सूचना दिल्या. संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
” आधुनिक तंत्रज्ञान वापरून हिंदवी स्वराज् इतिहास नवीन पिढीसमोर या स्मारकाच्या माध्यमातून साकार होईल. राजर्षी शाहू महाराज यांच्या चरित्राची ओळख निर्माण करणारे हे स्मारक असेल. आगामी पिढीला राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळण्यासाठी हे भव्य स्मारक गौरवशाली इतिहासाचा अखंड स्रोत राहील. श्री.संतोष दानवे, आमदार
श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे, स्वयम सामाजिक संस्था यांच्या संकल्पनेतून साकारणाऱ्या स्मारकामुळे ऐतिहासिक भोकरदन तालुक्याची नवीन ओळख निर्माण होणार आहे. यासाठी आमदार संतोष दानवे हे आग्रही पाठपुरावा करत आहेत. तसेच, पारध ग्रामपंचायत व ग्रामस्थांचे उत्तम सहकार्य लाभत आहे. शिवप्रेमींसाठी हे स्मारक आकर्षणाचे केंद्र ठरेल. – श्री रवींद्र सासमकर, इतिहास संशोधक






















