नाशिक येथील श्री ओसवाल जैन बोर्डिंग येथे अर्हम विज्जा प्रणेता उपाध्याय प. पू. श्री प्रवीणऋषिजी म. सा. यांच्या मार्गदर्शनाने जागतिक क्षमापना दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रवीणऋषिजी यांनी उपस्थित सर्व ६०० विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना ऑनलाइन मार्गदर्शन केले.
यासोबतच अर्हम डिस्कवर युवर सेल्फ कोच प्रा सपना पारख व शितल बंब यांनी सर्व विद्यार्थ्यांना साधना शिकवली.
अर्हम पॅरेंटिंग कोच प्रा सीए लोकेश पारख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
जैन बोर्डिंग चे अध्यक्ष सोहनलाल भंडारी व सेक्रेटरी शशिकांत पारख यांच्या सहकार्याने झालेल्या या कार्यक्रमास जैन बोर्डींगचे सहसेक्रेटरी नवीन बंब, रेक्टर राठोड सर, चोरडिया मॅडम, सर्व कर्मचारी वर्ग व विद्यार्थिनी, विद्यार्थी उपस्थित होते
जैन बोर्डिंग मध्ये जागतिक क्षमापना दिन उत्साहात साजरा






















