नांदगाव – प्रतिनिधी । गेल्या महिन्यात नांदगाव शहरासह तालुक्यातील खेडेगावांमध्ये दिवसागणिक चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.नांदगाव शहरासह ग्रामीण भागातील गावांमध्ये गेल्या काही महिन्यापासून घरफोड्या सत्र सुरू आहे. तालुक्यातील जळगाव बुद्रुक येथील प्रमोद विष्णू सोनवणे घरात कुणीही नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचा खिडकीचे ग्रिल वाकवून घरात प्रवेश केला असून, कपाट व कोंठ्यामधून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा ३ लाख१५ हजार ९०० रुपये लंपास केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदगाव तालुक्यातील जळगाव बुद्रुक येथील प्रमोद विष्णू सोनवणे यांच्या शेतातील घरामध्ये कुणीही नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचा खिडकीचे ग्रिल वाकवून घरात प्रवेश केला असून, कपाट व कोठ्यांमध्ये ठेवलेले रक्कम १,३०,०००/-आणि सोन्याचे किमती दागिने १,८५,९००/-चोरल्याचे उघड झाले. असा एकूण ३ लाख १५ हजार ९००/-रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले होते.. धाडसी घरफोडी संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांनी भेट दिली असून नाशिक येथील श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते..मात्र
श्वानाने नांदगाव -छत्रपती संभाजीनगर रस्त्यापर्यंत मार्ग दाखविला..
दरम्यान,शहर व तालुक्यातील गावांमध्ये घरफोडीमध्ये सर्वात मोठी घरफोडी झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे..
नांदगाव शहरासह तालुक्यातील खेडेगावात आणि प्रमुख शहरांमध्ये दिवसागणिक चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. चोरट्यांना कठोर शासन केले जात नसल्याने त्यांचे मनोधैर्य वाढत आहे. पोलिसांना याबाबत काहीच माहिती नाही, असे म्हणणे थोडे धाडसाचे ठरावे. त्यामुळे तालुक्यात चोर्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलिसांना भुरट्या चोरट्यांवर वचक प्रस्थापित करावा लागेल, गुन्हेगारीचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी देखील ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.शहर व तालुक्यामध्ये धाडसी घरफोडीचे प्रमाण अनेक दिवसांपासून वाढले असून मात्र घरफोडीचा अपवाद वगळता तपास लागत नसल्याने पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
नांदगाव तालुक्यात गुन्हेगारीचे वाढते प्रमाण नागरिक मध्ये भीती






















