पुणे चें योगेश व सुमिता सिद्धार्थ यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी कडून आमंत्रण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेजारी बसलेले पुणेचे योगेश सिद्धार्थ आणि त्यांच्या पत्नी सुमीता सिद्धार्थ – यांना पंतप्रधानांनी खास त्यांच्या निवासस्थानी आमंत्रित केलं. पण असं काय विशेष कार्य केलं त्यांनी, की पंतप्रधानही स्वतः त्यांचं अभिनंदन करावं असं वाटावं?
योगेश सिद्धार्थ हे भारतीय वायूदलाचे माजी अधिकारी आहेत. देशाच्या अत्यंत कठीण आणि संवेदनशील सीमेवर – सियाचिन ग्लेशियरवर – आपले जवान तैनात असतात. या भागात ऑक्सिजनची तीव्र टंचाई असते, जी अनेकदा जवानांच्या जीवावरही बेतू शकते.
याच समस्येवर तोडगा काढण्यासाठी योगेश सिद्धार्थ यांनी एक असाधारण निर्णय घेतला — त्यांनी आपली सर्व आयुष्यभराची बचत आणि घरातील दागिने विकून तब्बल १.२५ कोटींचा खर्च केला आणि सियाचिनमध्ये एक ऑक्सिजन निर्मिती केंद्र उभारलं.
हे ऑक्सिजन प्लांट हे जगातील सर्वात उंच युद्धभूमीवरील ऑक्सिजन उत्पादन केंद्र ठरलं आहे.
यामुळे आज २०,००० भारतीय जवानांना आवश्यक ऑक्सिजन उपलब्ध होतो आहे. सियाचिनमधील ऑक्सिजन अभावाची समस्या जवळजवळ संपुष्टात आली आहे.
समस्या सांगणारे खूप असतात, पण त्या सोडवणारे मोजकेच असतात!
योगेश आणि सुमीता सिद्धार्थ यांनी गोंगाट न करता, प्रसिद्धीचा माग न धरता, एक अत्यंत दुर्लभ आणि मातृभूमीप्रेमाने ओतप्रोत असलेला कार्य करत जगासमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठेवलं आहे. अशा या राष्ट्रसेवक दांपत्याला शतशः प्रणाम!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *