ओझर- द्राक्ष बागाईतदार संघाच्या कार्यालयात कृषी विभागाचे सचिव विकासचंद्र रस्तोगी यांचे स्पष्टिकरण
निफाड। प्रतिनिधी
प्रत्यक्ष क्षेत्रीय पाहणी व द्राक्ष बागाईतदार संघाने सुचविलेल्या प्लास्टिक क्राँप कव्हरबाबातच्या अडचणी उपाययोजना व शिफारशींचा सकारात्मक अहवाल शासनाला सादर करुन मंत्र्यांसमोर माडंणार असल्याचे स्पष्टीकरण महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचे अतिरिक्त सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी केले
कृषी विभागाचे अतिरिक्त सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी नुकताच नाशिक जिल्ह्यातील
दिंडोरी मालेगाव सटाणा या भागातील प्लास्टिक क्राँप कव्हरच्या द्राक्षबागांत प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली ओझर येथील द्राक्ष बागाईतदार संघाचे कार्यालयात महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे अध्यक्ष कैलासराव भोसले यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी द्राक्ष पिक उत्पादनात हवामानातील बदल व उपाययोजना यावर प्लास्टिक क्राँप कव्हरचा वापर गरजेचा होत असल्याचे द्राक्ष बागाईतदार संघाचे पदाधिकार्यांनी निदर्शनास आणुन दिले त्याबाबात शासनास्तरावर सकारात्मक अहवाल सादर करुन मंत्र्यांसमोर मांडल जाईल असे रस्तोगी यांनी स्पष्ट केले यावेळी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र पुणेचे डाँ अजयकुमार उपाध्याय , कृषी विभागाचे जिल्हा अधिक्षक रविंद्रजी माने , काळभोर ,द्राक्ष बागाईतदार संघाचे अध्यक्ष कैलासराव भोसले, नाशिक विभाग अध्यक्ष बाळासाहेब गडाख, मानद सचिव बबनराव भालेराव ,संचालक सुरेश कळमकर बाळासाहेब वाघ ,भारत सोनवणे ,भाऊसाहेब गवळी आदींसह कृषी विभागाचे अधिकारी व तज्ञ द्राक्ष बागाईतदार उपस्थित होते


























