*भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना प्रभाग क्रमांक ५ च्या उमेदवार सोनिया ताई रुपवते यांचा दमदार प्रचाराला सुरुवात*

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर याना अभिवादन करतना प्रभाग क्रमांक ५ च्या उमेदवार सोनिया ताई रुपवते, इंद्रमल शेट खंडेलवाल आणि आरपीआय चे युवा अध्यक्ष रुपेश रुपवते.

रायगड (प्रदीप सताने)
खोपोली नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५च्या भावी नगरसेविका सौ सोनिया मुकेश रुपवते यांनी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर लगेच निवडणूकीच्या जनहितार्थ प्रचार कार्याला सुरूवात करताना प्रथमतः विश्वरत्न कायदेपंडित भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र भारतीय संविधानाच्या सर्व कायदे प्रणालीला आणि त्याच्या अनमोल विचारांना अनुसरून काल खोपोली येथील विश्वरत्न कायदेपंडित भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र पुतळ्याला अभिवादन करुन भारतीय संविधानामध्ये बहुजनांच्या बाबतीत राजकीय क्षेत्रासंदर्भात विशेष करून अनुसूचित जाती मतदानाचा अधिकार आणि सविधानिक लोकप्रतिनिधी यांना आरक्षित राखीव जागा महात्मा गांधी यांचा याबाबत विरोध असताना सुद्धा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ठणकावून संविधान सभेत सांगितले की मी अनुसूचित जाती यांना मतदानाचा अधिकार आणि आरक्षित राखीव जागा मिळवून देणारच असा ठाम निश्चय केला होता आणि बाबासाहेबांनी अनेकांच्या विरोधाला न जुमानता बहुजनांना राजकीय आरक्षण आणि भारतीय सामान्य नागरिकांला मतदानाचा अधिकार अनेक यातना सहन प्रचंड मनुवादयाच्या विरोधाला सामोरे जाऊन हा ऐतिहासिक क्षण विश्वरत्न कायदेपंडित भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये प्राप्त करून दिला या क्षणाची आठवण आणि अनुसूचित जाती बहुजनावर केलेले कोटी कोटी उपकाराची जाणीव ही प्रत्येक निवडणुकीच्या वेळी , ऐतिहासिक महत्त्वपूर्ण शासकीय निर्णय, या सर्व महत्त्वपूर्ण बाबींची जनहितार्थ प्रचाराची सुरुवात करताना भारतीय संविधानिक लोकप्रतिनिधी म्हणून विश्वरत्न कायदेपंडित भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मनःपूर्वक वंदन आणि कोटी कोटी प्रणाम करून खोपोली नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या भावी नगरसेविका सौ सोनिया मुकेश रुपवते यांनी प्रचाराची खऱ्या अर्थाने सुरुवात केली आहे तसेच ताईंनी प्रभाग क्रमांक ५ अ मधील समस्त मनःपूर्वक आणि आदरपूर्वक संदेश दिला आहे की २ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७.३०ते सायंकाळी ५.३० या वेळेत विश्वरत्न कायदेपंडित भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय संविधानातील मतदानाचा सर्वाच्य अधिकार प्रत्येक भारतीय संविधानिक नागरिकांनी बजावावा तसेच भाजप पक्षाचे अधिकृत कमळ या चिन्हासमोरील बटण दाबून भरघोस मतांनी विजयी करावे असे भावी नगरसेविका भाजप पक्षाचे अधिकृत उमेदवार सौ.सोनिया मुकेश रुपवते यांनी खोपोली नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक ५ अ मधील समस्त जनतेला आदरपूर्वक आणि विनंती पूर्वक सविस्तर सांगितले आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *