मालेगाव येथील क्रूर अत्याचाराविरोधात उमराणे ग्रामस्थ आक्रमक; आरोपीला ‘कठोरातील कठोर’ शिक्षेची मागणी

मालेगाव येथील क्रूर अत्याचाराविरोधात उमराणे ग्रामस्थ आक्रमक; आरोपीला ‘कठोरातील कठोर’ शिक्षेची मागणी
नाशिक महानगर पालिका निवडणुकित आत्तापर्यंत ५२५ इच्छुकांनी अर्ज नेल्याचे भाजप नाशिक महानगर जिल्हा अध्यक्ष सुनील केदार यांनी सांगितले. यात डॉक्टर,इंजिनियर,प्राध्यापक, उद्योजक, व्यापारी, पदवीधर, समाजातील विविध प्रतिष्ठित अशा अनेक व्यक्तींचा समावेश आहे. इच्छुकांचे वेगवेगळ्या स्थरावर सर्वे सुरू आहे.त्यानुसार कोअर कमिटीत निर्णय होईल. नाशिक महानगर पालिका निवडणुक तिसऱ्या टप्प्यात होणार आहे.त्यामुळे सध्या केंद्र व राज्य सरकारच्या विकासकामांची माहिती आम्ही मतदारापर्यंत पोहचवत आहोत असी माहिती
*सुनील केदार*
अध्यक्ष- भाजप नाशिक महानगर जिल्हा यांनी दिली

 

उमराणे वार्ताहर: मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात १६ नोव्हेंबर २०२५ रोजी एका चार वर्षांच्या लहान बालिकेवर अमानुष अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या करण्याच्या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण नाशिक जिल्हा हादरला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद उमराणे येथे उमटले असून, समस्त ग्रामस्थांनी या नराधम आरोपीला ‘कठोरातील कठोर शिक्षा’ व्हावी, यासाठी देवळा पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर केले आहे.
तीव्र भावना आणि संयमाचा बांध
उमराणे येथील ग्रामस्थ आज (१८ नोव्हेंबर २०२५)रात्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमले होते. त्यांनी मेणबत्ती मोर्चाच्या माध्यमातून पीडित बालिकेस श्रद्धांजली वाहिली. निवेदनात ग्रामस्थांनी या कृत्याचा निषेध व्यक्त करत, जनतेच्या भावना अत्यंत तीव्र असून, संयमाचा बांध कधीही फुटू शकतो आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे. त्यांनी आसाम राज्यात घडलेल्या एका घटनेचा उल्लेख करून जनतेने कायदा हातात घेतल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांची जाणीवही करून दिली आहे.
ह्याप्रसंगी माजी पंचायत समिती सभापती धर्माअण्णा देवरे, जाणता राजा अध्यक्ष नंदन देवरे, महाराष्ट्र विद्युत कामगार सेना जिल्हा सचिव प्रदीप देवरे, किशोर सोनवणे यांची निषेधपर भाषणे झालीत.
भाषणात वक्त्यांनी
> “अपराधी फक्त अपराधी असतो. त्याला कुठलीही जात नसते अथवा कोणताही धर्म नसतो.” –
सखोल चौकशी आणि कठोर शिक्षेची मागणी सखोल चौकशी: ग्रामस्थांनी या घटनेतील मुख्य आरोपीला अन्य कोणी साथीदार आहेत का, याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
* कठोर शिक्षा: या प्रकरणातील दोषी नराधमाला भारतीय न्याय संहितेतील कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी त्यांची मुख्य मागणी आहे.
* जातीपातीचे राजकारण निंदनीय: घटनेनंतर समाजातील काही घटक आरोपी आणि पीडितेची जात शोधण्याचा प्रयत्न करत आहेत, हे अतिशय निंदनीय कृत्य असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे.
* पीडितेच्या कुटुंबाची गोपनीयता: सोशल मीडियावर पीडितेचा फोटो, तिचे नाव व तिच्या परिवाराचे नाव उदासपणे घेतले जात आहे, असे करणे म्हणजे त्यांच्या दुःखात भर घालण्यासारखे असून, हे माणुसकी शून्य झाल्याचे लक्षण आहे.
ग्रामस्थांच्या तीव्र भावना पाहता, हे प्रकरण अत्यंत संवेदनशील बनले आहे. त्यांनी प्रशासनाला या निवेदनावर आरोपी ला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.
दरम्यान या घटनेमुळे कोपर्डी प्रकरणासारखीच परिस्थिती मालेगाव आणि आसपासच्या परिसरात निर्माण झाली असून, ठिकठिकाणी आंदोलने, मोर्चे आणि रास्ता रोको होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *