मालेगाव ( विनोद जैन )धार्मिक सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर, सेवाभावी आमचे मित्र आदरणीय श्री शांतीलालजी बाफना यांचे लघु भ्राता, मितभाषी, सेवाभावी,सरल स्वभावी, मालेगाव श्री संघाचे सक्रिय सदस्य,रसीला कोल्ड्रिंक्स चे मालक महेंद्र (बाळू भाऊ) बाफना यांचे आकस्मिक निधन झाले.संपूर्ण जैन समाज आणि मधुबन कॉलनी रहिवासी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. श्री संघाच्या तत्वाधानात गेल्या अनेक वर्षांपासून सिध्द सामायिक,पख्खी धर्म आराधना, गुरुवार स्वाध्याय,गौतम निधी अश्या अनेक कार्यात अभूतपूर्व योगदान होते.धर्म दलाली मध्ये नेहमीच अग्रेसर होते.दोन्ही भावांमधील प्रेम तर समाजासाठी आदर्श होता. शांतीलाल जी नी संयुक्त कुटुंब चालवण्यासाठी अनमोल योगदान दिले आहे.आदर आतिथ्य, सेवाभाव, प्रेमी, स्नेह वात्सल्य हे तर जणू बाफना परिवाराचा अलंकारच.
सुशील भाऊ आणि महेंद्र भाऊ ची जोडी तर जैन स्थानक मध्ये आदर्श जोडी होती.अतिशय समर्पित कार्यकर्ता म्हणून नेहमीच धर्म कार्यात अग्रेसर होते.
आपण सर्व जण मिळून परमेश्वर चरणी प्रार्थना करुया की महेंद्र बाळू भाऊ च्या आत्म्याला चिरशांती आणि सदगती लाभो.
बाफना आणि उंबरखेड निवासी कोठारी परिवाराला दुःख सहन करण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना 🙏 महेंद्र भाऊ सारखे DEVOTEE कार्यकर्ते समाजात तयार होवो हीच अभिलाषा 🙏 गुणीजनों को देख ह्दय में, मेरे प्रेम उमड आवे
हर किसी के बारे में नहीं लिखा जाता उसके लिये जीवन और कार्य भी वैसा होना चाहिए।
असे भावनात्मक श्रदांजली युवा नेते
.बालचंद छाजेड, डॉ विनोदकुमार जैन,श्री संघ मालेगाव (नाशिक) यानी व्यक्त केले
महेंद्र बाफना*अजात शत्रू ,धर्मनिष्ठ आदर्श कार्यकर्ता हरपला

























