कै. तात्यासाहेब बोरस्ते विद्यालय, नांदूर मध्यमेश्वर विद्यालयात गुरुशिष्य पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली.

लासलगाव: के टी बी विद्यालय नांदूर मध्यमेश्वर विद्यालयात गुरू शिष्य पुण्यतिथी साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय स्कूल कमिटीचे अध्यक्ष हरिश्चंद्र भवर आप्पा हे होते.सर्वप्रथम विद्यालयाचे मुख्याध्यापक राजोळे व्ही टी यांनी या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून कर्मवीरांनी सहकार क्षेत्रात केलेल्या कार्याची माहिती सांगितली. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिश्चंद्र भवर आप्पा व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर काकासाहेब वाघ व कर्मवीर माधवराव बोरस्ते यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. या प्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मनोगतातून कर्मवीर काकासाहेब वाघ व कर्मवीर तात्यासाहेब बोरस्ते यांच्या कार्याची माहिती सांगितली.तसेच विद्यालयाचे उपशिक्षक नवले आर टी यांनी कर्मवीर माधवराव बोरस्ते तर शिंदे एम एम यांनी कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या जीवनकार्याची माहिती सांगितली.तर उच्च माध्यमिक विद्यालय समितीचे अध्यक्ष बाळनाथ आण्णा शिंदे यांनी आपल्या मनोगतातून नांदूर मध्यमेश्वर विद्यालयाच्या जडणघडणीत कर्मवीर माधवराव बोरस्ते यांचा सिंहाचा वाटा आहे असे सांगितले. तर अभिनव बाल विकास मंदिर समितीचे अध्यक्ष चव्हाणके सर यांनी आपल्या मनोगतातून कर्मवीर माधवराव बोरस्ते यांनी संस्थेसाठी व सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याची माहिती सांगितली. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिश्चंद्र भवर आप्पा यांनी आपल्या मनोगतातून कर्मवीर काकासाहेब वाघ व कर्मवीर तात्यासाहेब बोरस्ते यांनी केलेल्या सहकार शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील तसेच राजकीय क्षेत्रातील कार्याची माहिती सांगितली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आवारे के बी यांनी केले, तर आभार पवार ए एम यांनी मानले. या कार्यक्रमास शालेय समितीचे सदस्य दत्तात्रय नाईकवाडे विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक गोसावी ए ए, .बेंडकोळी यु जे, शिंदे बी एन,. सुकेनकर आर ए, . भांगरे , श्रीम.कोटकर, निकम,. शिरापुरे, कोकणी एस एस श्रीम.तासकर एम सी तसेच माध्यमिक अभिनव बाल विकास मंदिर ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *