आम आदमी पार्टीचे “झोपा काढा”आंदोलन! गटविकास अधिकार्‍यांच्या मध्यस्थीने मागे!

भोकरदन (महेंद्र बेराड)आम आदमी तालुका संयोजक श्री बोरसे गुरुजी
प्रमुख मागण्या —
1) भोकरदन तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या पडायला आलेल्या शाळा खोल्या त्वरित पाडून नवीन खोल्या बांधकाम करण्यात यावे.
2) शिक्षकांच्या जागा रिक्त ठेवु नयेत. प्रत्येक विषयासाठी  तज्ञ शिक्षकाची नेमणुक करण्यात यावी.कोणत्याही शिक्षकाला अशैक्षणिक काम देण्यात येऊ नये. प्रतिनियुक्तीवर इतरत्र पाठवू नये किंवा ऑफिसमध्ये बोलावून घेऊ नये.
3) प्रत्येक शाळेला संरक्षण भिंतीची, खेळाच्या मैदानाची व्यवस्था करण्यात यावी.
4) प्रत्येक शाळेमध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.
5) प्रत्येक शाळेमध्ये मुला मुलींसाठी स्वतंत्र उत्तम दर्जाचे स्वच्छता गृह बनवण्यात यावेत.
6) वर्ग खोलीमध्ये लाईट पंखे व्यवस्था करण्यात यावी तसेच प्रत्येक शाळेला स्वतंत्र मीटर देऊन लाईट बिल भरणा करण्याची व्यवस्था शासनाने करावी.
7) शिक्षकांना  नेमणूक दिलेल्या गांवात राहणे बंधनकारक करावे.
8) विद्यार्थ्यांना बसण्यासाठी आरामदायी डेक्सबेंच ची व्यवस्था करावी.
9) प्रत्येक शाळेला एक सेवक व एक लिपीक नेमावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *