चांदवड (कीर्ती गुजराथी) –
सटाणा तालुक्यातील खमताने येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा चांदवड तालुका महाराष्ट्र नाभिक महामंडळांच्या वतीने निषेध व्यत करण्यात आला. घटनेच्या निषेधार्थ प्रांताधिकारी कैलास कडलग, पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांना निवेदन देऊन घटनेतील नराधम आरोपीला फाशीची शिक्षा करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी नाभिक जिल्हा संपर्कप्रमुख प्रविण वाघ, चांदवड शहराध्यक्ष गणेश जगताप, जिल्हा कार्याध्यक्ष गणेश बिडवई, तालुकाध्यक्ष महेश बोराडे, एकता तालुकाध्यक्ष सतिश बिडवई, तालुका उपाध्यक्ष संदिप आहेर, तालुका सरचिटणीस नितीन आहेर, किरण जगताप, दिनेश बिडवई, अमोल मढवे, अविनाश जाधव, इंद्रभान बोरसे, अनिल बोराडे, ॠषिकेश बोराडे, राकेश सोनवणे, राजू वाघ, संतोष मढवे आदींसह तालुक्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
————–
फोटो- चांदवड येथे पोलीस उपनिरीक्षक यांना निवेदन देताना चांदवड तालुका महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे पदाधिकारी व समाजबांधव.


























