प्रदीप सताने (रायगड)
रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील साजगाव येथे पैंजण महोत्सव 2025 छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये प्रथमच मोठ्या उत्साहात आयोजित केले होते त्यामध्ये अनेक चांदीच्या सोन्याचे पैंजणाचे प्रदर्शन केले गेले त्यामध्ये असंख्य खालापूर तालुक्यातील महिलांचा प्रतिसाद लाभला तसेच असंख्य होम मिनिस्टर खेळाचे उपक्रम राबविले गेले महिला मध्ये अनोखा उत्साह आणि जोश दिसून येत होता महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाही ती सर्व काही करु शकते पुरुषांच्या बरोबरीने आता उभी राहण्याचा धाडस हिम्मत दाखवू शकते असे त्या प्रदर्शनात दिसून येत होते खूप उत्तम रित्या पैंजण महोत्सव प्रदर्शन राबविण्यात आले होते आणि त्या महोत्सवामध्ये 1 ST WINNER कु.साक्षी थोरवे विजयी झाली तसेच , 2ND WINNER सौ.सुमिता प्रदिप सताणे विजयी झाल्या अशारितीने अतिशय उत्साहात पैंजण महोत्सव 2025 खालापूर तालुक्यातील छात्रपती शिवाजी महाराज सभागृह साजगाव येथे ग्रुप ग्रामपंचायत साजगाव यांच्या विशेष संमतीने साजरा झाला. या ठिकाणी खरेदीदार व प्रदर्शन बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली होती याप्रसंगी पत्रकार प्रदीप सताने उपस्थित होते..
रायगड पैंजण महोत्सव मलबार गोल्ड अँड डायमंड 20.25 मोठ्या उत्साहात साजरा याप्रसंगी सौ सुमिता सताने विजयी..






















