चांदवड (कीर्ती गुजराथी) –
येथील श्री नेमिनाथ जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील एनसीसी विभागप्रमुख राजेश चव्हाण यांना असोसिएट एनसीसी ऑफिसर वेलफेअर बोर्ड महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ‘आदर्श राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी’ पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
श्री नेमिनाथ जैन विद्यालयात एनसीसी विभागप्रमुख राजेश चव्हाण हे अनेक वर्षांपासून एनसीसीच्या माध्यमातून देशभक्ती, एकता, शिस्त, सेवाभाव, नेतृत्व गुण तसेच विद्यार्थांमध्ये सैन्यदलात भरती होण्याची प्रेरणा रुजविण्याचे कार्य करत आहेत. या सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन असोसिएट एनसीसी ऑफिसर वेलफेअर बोर्ड महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने एनसीसी विभागप्रमुख, तीन महाराष्ट्र बटालियनचे चीफ ऑफिसर राजेश चव्हाण यांना ब्रिगेडियर शिरीष ढोबळे, कॅप्टन मनोज भामरे यांच्याहस्ते ‘बेस्ट एनसीसी ऑफिसर’ अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराबद्दल त्यांचे संस्था पदाधिकार्यांसह प्राचार्य शिवदास शिंदे, उपप्राचार्य देवेंद्रराज जैन, पर्यवेक्षक रामचंद्र पाटील, शिक्षक व कर्मचार्यांनी अभिनंदन केले.
——
फोटो- चांदवड येथील श्री नेमिनाथ जैन विद्यालयातील एनसीसी विभागप्रमुख राजेश चव्हाण यांना आदर्श राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी पुरस्काराने सन्मानीत करताना मान्यवर.


























