चांदवडला घरफोडीत ७३ हजारांचा ऐवज लंपास

 

चांदवड | महेंद्र गुजराथी
येथील वरचे गाव येथील रहात्या घरात अज्ञात चोरट्याने रात्रीच्या सुमारास घरफोडी करुन सोन्याचे दागिणे व रोकड असा एकूण ७३ हजार ७५ रुपये किमतीचा ऐवज लंपास केला.
याबाबत असिफ महमद शेख (रा. वरचे गांव, चांदवड) यांनी चांदवड पोलीसांत फिर्याद दिली. मंगळवारी (दि. २५) रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने घरफोडी करुन घरातील सोन्याचे मणी, सोन्याचे कानातील जोड, सोन्याची अंगठी, सोन्याचे पौंड पँडल, सोन्याच्या कानातील बाळ्या, रोकड व गॅस टाकी असा एकूण ७३ हजार ७५ रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेला. याबाबत चांदवड पोलीसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस हवालदार सचिन राऊत करीत आहेत.
————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *