नाशिक ता.११ प्रतिसादाशिवाय भावभावनाचा गुंता कधीच सुटत नाही, त्यासाठी प्रतिसाद हेच शाश्वत सत्य आहे, असे प्रतिपादन सदाशिव सुतार यांनी केले.
गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा स्मारक येथे आयोजित पुस्तकावर बोलू काही या अभिनव उपक्रमात सदाशिव सुतार निर्भर या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करत होते. अध्यक्षस्थानी मधुकर गिरी होते.
सदाशिव सुतार पुढे म्हणाले की, साहित्यात भावना असतात. या भावना समजून घेण्यासाठी प्रतिसाद मिळाला तर कविता किंवा इतर साहित्यातुन मानवी मनाचा ठाव घेता येतो.भाव संपन्न होण्यासाठी रसीकता आवश्यक असते. भावविश्व समजून घेतले तर निर्भर पणे आपणास समर्पणाची भावना तयार होते.कोणाला किंवा कोणासाठी काही तरी देण्याचा भाव निर्भर असला पाहिजे. साहित्यात प्रतिभा आणि प्रतिबिंब असल्याशिवाय साहित्यात भाव तयार होत नाही. सांकेतिक रेषा आयुष्यात अनेक गोष्टी चा मागोवा दाखवत असते. साहित्यात कलात्मक आनंद असतो, असेही ते म्हणाले.
यावेळी संजय दुनबळे आणि सागर बोडके या भाग्यवान विजेत्यांना ग्रंथभेट देऊन सन्मानीत करण्यात आले.
सुरेश पवार यांनी सुत्रसंचालन केले. जनार्दन देवरे यांनी आभार मानले. दरम्यान येत्या मंगळवारी १५ जुलै रोजी विनया काकडे माझी या मना या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
प्रतिसादाशिवाय भावनांचा गुंता सुटत नाही-सदाशिव सुतार






















