सावता सेनेच्या वर्धापन दिना निमित्त वर्षा शिंदे यांचा अभिनव उपक्रम विधवा महिलांसाठी मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण

पाटोदा (प्रतिनिधी) सावता सेनेच्या नवव्या वर्धापन दिना निमित्त सामाजिक भान जपत मराठवाडा महिला विभागीय अध्यक्षा सौ. वर्षा शिंदे यांनी एक प्रेरणादायी आणि स्तुत्य उपक्रम राबविला आहे. त्यांनी विधवा महिलांसाठी मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करून त्यांना आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक नवी वाट दिली आहे.या उपक्रमाचा उद्देश केवळ आर्थिक स्वावलंबन नव्हे, तर महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे आहे. विधवा महिलांना समाजात स्वाभिमानाने जगता यावे, त्यांच्या कर्तृत्वाला एक व्यासपीठ मिळावे, या हेतूने या प्रशिक्षणाची सुरुवात करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन सावता सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी अनेक महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. सौ. वर्षा शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले, “महिलांना सक्षम करणे ही काळाची गरज आहे. विधवा महिलांना केवळ मदतीची नाही, तर संधीची गरज आहे. आणि हे प्रशिक्षण त्याच दिशेने एक पाऊल आहे.”या उपक्रमामुळे अनेक महिलांचे आयुष्य बदलण्याची शक्यता असून, सावता सेनेच्या सामाजिक जाणिवेचे हे एक उत्कृष्ट उदाहरण ठरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *