➡️ “लेफ्टनंट आदित्य भाकरे यांचे यश संपूर्ण पाटोद्यासाठी अभिमानास्पद” – अजय जोशी
पाटोदा (गणेश शेवाळे) शहीद संजय भाकरे यांचे चिरंजीव चि. आदित्य संजय भाकरे यांची भारतीय सैन्यात ‘लेफ्टनंट’ पदी निवड झाल्याबद्दल मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. शहीद संजय भाकरे यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाचा वारसा आदित्य भाकरे यांनी सैन्यात अधिकारी म्हणून समर्थपणे पुढे नेला आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण पाटोदा तालुक्याचा मान उंचावला असून, तरुण पिढीसाठी ते प्रेरणास्थान ठरत आहेत.यावेळी पाटोदा तालुका पत्रकार अध्यक्ष अजय जोशी यांनी आपल्या प्रतिक्रियेत सांगितले की, “लेफ्टनंट आदित्य भाकरे यांची निवड ही केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण पाटोदा तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे. शहीद संजय भाकरे यांचा देशसेवेचा वारसा पुढे नेणारा हा क्षण प्रेरणादायी असून, मराठी पत्रकार परिषद अशा कर्तृत्ववान युवकांना नेहमीच प्रोत्साहन देईल.” कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी लेफ्टनंट आदित्य भाकरे यांना पुढील सैनिकी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. देशभक्तीची भावना अधिक दृढ करणारा हा सत्कार सोहळा उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.
मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने लेफ्टनंट आदित्य भाकरे यांचा सत्कार

























