चांदवड (कीर्ती गुजराथी) –
वीजेसंदर्भात चांदवड शहर व परिसरातील ग्राहकांना येणार्या अडचणी व समस्या सोडविण्याची मागणी सामाजीक कार्यकर्ते राहुल जमदाडे यांनी विद्युत मंडळाचे सहायक अभियंता डी. जी. देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या ग्रामीण भागात बिबट्याचा वावर असल्यामुळे बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी रात्रीच्या वेळेस शेतीपिकांना पाणी देण्यास घाबरतात. त्यामुळे शेतीसाठी दिवसा बारा तास वीजपुरवठा करावा, स्मार्ट मीटरबाबत असलेला संभ्रम दूर करावा, वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासात व्यत्यय येतो तसेच नागरीकांनाही विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे सुरळीत वीजपुरवठ्यासाठी वीज वितरण कंपनीने लक्ष द्यावे, अशी मागणी सामाजीक कार्यकर्ते राहुल जमदाडे यांनी केली. याबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
——
फोटो- चांदवड येथे सहाय्यक अभियंता डी. जी. देशमुख यांना निवेदन देताना सामाजीक कार्यकर्ते राहुल जमदाडे.

























