बिबटयाच्या भीतीने शेतकऱ्यांची जोरदार मागणी
लासलगाव(आसिफ पठाण )
ब्राह्मणगांव(विंचूर) व परिसरात गेल्या दोन दिवसापासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याने शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहेत.सध्या रब्बी हंगामातील पिके गहू,कांदे,हरबरा,पाले भाज्या यांना पाणी भरण्यासाठी शेतीशेतीपंपांना दिवसा विजपुरवठा उपलब्ध होत नसल्याने रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना व शेतमजुरांना शेतीचे कामे करावे लागत आहे.मात्र बिबट्याच्या भितीमुळे रात्री शेतात जाणे धोकादायक वाटत असल्यामुळे या भागात महावितरण कंपनीने शेतीपंपांना रात्रीचा वीजपुरवठा न करता दिवसाचा वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा या मागणीचे लेखी निवेदन ब्राह्मणगाव(विंचूर)परिसरातील शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीचे उपअभियंता भोईर यांना दिले आहे
ब्राह्मणगाव(विंचूर)परिसराती सध्या रब्बी हंगामातीला पिके उभी करण्यासाठी शेतकरी शेतात दिवस-रात्र मेहनत घेत आहेत.मात्र रात्रीच्याच वेळेस शेतीपाणी करण्यासाठी वीज उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.त्यातच बिबट्याचे वाढते प्रमाण पाहता रात्री शेतात जाणे जीव धोक्यात घालण्यासारखे ठरत आहे. त्यामुळे दिवसा वीजपुरवठा सुरू करण्याची तातडीची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
भविष्यात बिबट्याच्या हल्ल्यात कोणी दगावले तर त्यास जबाबदार वीज वितरण कंपनीचे अधिकारी असतील असे शेतकऱ्यांनी या वेळी ठणकावून सांगताच त्यावर विज वितरण चे अधिकारी भोईर यांनी सर्व शेतकऱ्यांना दिवसा विजपुरवठा करण्याचे आश्वासन दिले.निवेदन देतांना उपसरपंच राहुर शेजवळ , राजाराम गायकवाड,सुनील गवळी,संपत जाधव,संदीप नवले,सुनील गायकवाड, रमेश गायकवाड,महेश गवळी यांच्यासाह इतर शेतकरी उपस्थित होते.
फोटो कॅप्शन
ब्राह्मणगाव(विंचूर)परिसरात शेतीपंपांना दिवसा वीजपुरवठा सुरू करावा या मागणीचे निवेदन वीज वितरण कंपनी अधिकारी यांना देताना ब्राह्मणगाव (विंचूर)परिसरातील शेतकरी


























