*प्रीतम हुलेची सिंधुदुर्ग येथे चमकदार कामगिरीने ढाळेवाडी जि.प शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा*

​पाटोदा *(गणेश शेवाळे)* पाटोदा
​तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ढाळेवाडी, अभिमानास्पद बाब घडली आहे.शाळेचा विद्यार्थी प्रीतम शामराव हुले हीने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत थेट राज्यस्तरीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धा २०२५-२६ मध्ये सहभाग नोंदवला आहे.​महाराष्ट्र शासन,क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्या वतीने सिंधुदुर्ग येथे दि. ८ ते ११ डिसेंबर २०२५ या कालावधीत आयोजित केलेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत,प्रीतमने १४ वर्षांखालील मुलांच्या 36 कि.ग्रॅ. वजन गटात बीड जिल्ह्याचे व छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रतिनिधित्व केले.
​राज्य पातळीवर कुस्तीसारख्या महत्त्वाच्या क्रीडा प्रकारात सहभाग घेणे हे विद्यार्थी व शाळेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण यश आहे. प्रीतमने दाखवलेला उत्साह, मेहनत आणि खेळाप्रतीची निष्ठा निश्चितच कौतुकास्पद आहे. या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वर्गाने प्रीतमचे अभिनंदन केले असून, त्याच्या पुढील शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
​”प्रीतमने राज्य स्तरावर आपला सहभाग नोंदवून केवळ शाळेचेच नव्हे, तर संपूर्ण तालुक्याचे नाव उंचावले आहे. त्याच्या या मेहनतीला आणि जिद्दीला सलाम. भविष्यात ती मोठे यश संपादन करेल यात शंका नाही,” असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.”​सर्व नागरिकांनी आणि क्रीडाप्रेमींनी प्रीतम शामराव हुले हिच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *