सिद्धार्थ तायडे
जळगाव जामोद :येथील सामाजिक धार्मिक तसेच राजकीय क्षेत्रात सदैव अग्रेसर असलेले बहुगुणीत्व व्यक्तिमत्व जगदीश हातेकर यांना 26 नोव्हेंबर 2025 रोजी भारतीय संविधान दिनानिमित्त समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. बहुजन समाज कलावंत सेवाभावी बहुउद्देशीय संस्था तामगाव ता-संग्रामपुर जि-बुलढाणा च्या वतीने भारतीय संविधान दिन महोत्सव सोहळा संत गुलाब बाबा विद्यालय संग्रामपूर येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी भारतीय बौध्द महासभा ता-अध्यक्ष जळगाव जामोद बौध्दाचार्य आयु.जगदीश हातेकर यांना “समाज भूषण” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले जगदीश हातेकर हे गेली पाच वर्षा पासुन भारतीय बौद्ध महासभेचे ता-अध्यक्ष असुन त्यांनी कमी कालावधीत समाजा मधे धम्म प्रचाराच्या माध्यमातून जागृती केली अज्ञान, अंधश्रध्दा, कर्मकांड यातुन समाज कसा मुक्त होईल यावर त्यांचा खास भर असतो भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून तीन बौध्दाचार्य श्रामणेर शिबीर, चार समता सैनिक दल प्रशिक्षण शिबीर, चार महीला धम्म प्रशिक्षण शिबीर व प्रवचन मालेकेच्या माध्यमातून समाजामधे “तथागत भगवान बुद्धांच” तत्वज्ञान समाजामधे पेरन्याच काम केले एवढेच नव्हे तर “*बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर*” यांचे नातु *”आद.डाॅ.भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब”* राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष समता सैनिक दल यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य अशा धम्म परीषदेच आयोजन केले अशा त्यांच्या बौद्ध धम्मीय कार्याची दखल घेऊन त्यांना “समाज भूषण” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आद.प्रशांतभाऊ वाघोदे जिल्हा नेते वंचित बहुजन आघाडी व भाई बाबुराव सरदार भुमी मुक्ती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता यांचे मार्गदर्शन झाले
गायक महेंद्रदादा सावंग,डाॅ.प्रा.किशोर वाघ संभाजी नगर,रिताताई खंडारे आकोला,दिपालीताई इंगळे अमरावती यांचा सुध्दा गीत गायनाचा कार्यक्रम झाला तर देवाभाऊ दामोदर यांना सुध्दा समाज भूषण पुरस्कार देण्यात आला रामभाऊ तायडे लाडणापुर, साहेबराव वानखडे,राजेंद्र वानखडे,प्रियंका मेटांगे, सुवर्णा टापरे,प्रतिभाताई इंगळे,उदेभान उमाळे, राजेंद्र इंगळे,अभयसिंग मारोडे यांना सुध्दा विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संविधानाची प्रस्तावनेचे वाचन आदित्य प्रदीप जाधव यानी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर ससाने यांनी केले, तर प्रास्ताविक राहुल इंगळे सर यांनी कले.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी समाज भूषण रविदादा पहुरकर होते. आभार प्रदर्शन समीती अध्यक्ष श्रीकृष्ण हातेकर यांनी केले समारोप राष्ट्र गीताने करन्यात आला.


























