( तुषार शिंपी. एरंडोल)
प्रतिनिधी – एरंडोल पंचवार्षिक नगर परिषद २०२५ च्या माघारीच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेच्या शारदा अतुल मराठे बिनविरोध निवडून आल्या.
एरंडोल नगर परिषद तर्फे घेण्यात येणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक ७ अ मधील सर्वसाधारण महिला प्रवर्गातून तीन महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभ्या होत्या.आज माघारीच्या शेवटच्या दिवशी आरती सागर सिंह जोहरी,श्रद्धा विशाल वंजारी यांनी माघार घेतल्याने शिवसेनेच्या शारदा अतुल मराठे या बिनविरोध निवडून आल्या.याप्रसंगी आमदार अमोल पाटील यांनी अभिनंदन केले आहे.तर याप्रसंगी युवा सेना जिल्हा प्रमुख प्रा.मनोज पाटील,शिवसेना जिल्हा प्रमुख वासुदेव पाटील,धरणगाव बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,धनंजय खैरनार,विठ्ठल वंजारी,सुभाष मराठे,चंदू जोहरी,गणेश जोहरी,अतुल मराठे ,प्रविण मराठे आदी समर्थकांसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.विजयी उमेदवार शारदा अतुल मराठे यांची वाजता गाजत मिरवणूक काढण्यात आली.एरंडोल नगर परिषद पंचवार्षिक २०२५ मध्ये शिवसेनेचा पहिला नगरसेविका प्रथम बिनविरोध निवडून आल्या आहेत.
दरम्यान आज माघारीच्या शेवटच्या दिवशी एरंडोल नगर परिषद पंचवार्षिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी ७ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते तर दोन जणांनी माघार घेतल्याने ५ नगराध्यक पदासाठी उमेदवार निवडणूक लढवणार आहे.तसेच एकूण ८४ उमेदवारांनी नगरसेवक पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते.यातून २० उमेदवारांनी माघार घेतल्याने एकूण २२ जागांसाठी ६४ उमेदवार निवडून रिंगणात उभे आहेत.
एरंडोल येथे शिवसेनेच्या शारदा अतुल मराठे बिनविरोध.


























