लासलगाव : ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, लासलगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक श्री. भास्कर शिंदे यांनी नागरिकांना व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या ‘Meesho’ (मीशो) नावाच्या ग्रुप लिंकपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
श्री. शिंदे यांनी दिलेल्या जाहीर सूचनेनुसार, नागरिकांच्या मोबाईल फोनवर सध्या मीशोच्या नावाने व्हॉट्सअॅपवर काही लिंक्स येत आहेत. नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत या लिंक उघडू नयेत किंवा त्या मेसेजला उत्तर देऊ नये.
*हा आहे मोठा सायबर फ्रॉड*
पोलीस निरीक्षक शिंदे यांनी स्पष्ट केले आहे की, ही एक मोठी सायबर फसवणूक आहे.
या लिंक्स उघडल्यास, सायबर गुन्हेगार आपल्या बँक खात्यातून पैसे काढून घेऊ शकतात.
अशा फसवणुकीमध्ये नागरिकांची आर्थिक लूट होण्याची शक्यता आहे.
*लासलगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन*
पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की,
व्हॉट्सअॅपवर येणारी कुठलीही अनोळखी लिंक ओपन करू नका.
त्या लिंकला प्रतिसाद देऊ नका.
सर्वजण सतर्क राहूया, सुरक्षित राहूया – असे आवाहन श्री. भास्कर शिंदे यांनी केले आहे.
सायबर सुरक्षेसाठी महत्त्वाचा इशारा: ऑनलाइन शॉपिंग ॲप्स किंवा इतर कोणत्याही आकर्षक योजनांच्या नावाखाली येणाऱ्या संशयास्पद लिंक्सपासून नागरिकांनी जागरूक राहणे आवश्यक आहे.


























