*चिंच खाल्ल्याने मुळापासून बरे होतात ‘हे’ रोग…..*

 

मधुर-आंबट चवीची चिंच म्हणजे प्रत्येक भारतीय व्यक्तीच्या बालपणात आवडता असणारा खाद्य पदार्थ आहे. चिंच अत्यंत रुचीकर असून तिचा वापर थेट औषध म्हणून करता येतो तसेच चिंचेच्या उपयोगाने मुळापासून बरे होतात रोग तर जाणून घेवूया उपयोग.

*चिंचेपासून तयार केलेले “चिंचालवण तेल” पोटदुखीवरचे उत्तम औषध आहे.जेवताना भाताच्या पहिल्या घासाबरोबर हे तेल मिसळून घेतले कि पोटदुखीसारखी दुखणी लवकर बरी होतात.

*पिकलेली चिंच वातपित्त आणि कफ अशा तिन्ही दोषांचे शमन करते. चिंचेचे सरबत उत्तम पित्तशामक आहे. ज्यांना पित्त वाढून शरीरात उष्णता वाढत चालली आहे असे वाटते त्यांनी एक कप चिंचेचे सरबत उष्णता कमी होई पर्यंत घ्यावे.

*तोंडाला चव नसेल तर चिमुटभर मीठ लावून पिकलेली आणि मऊ झालेली चिंच खावी.

*हृदयाची ताकद कमी झाली कि पिकून मऊ झालेली काळी चिंच सरबत करून घेतात. हृदयाच्या स्नायूंना ताकद देण्याचे काम चिंच करते.

*मुका मार लागून सूज आली कि चिंचोके ( चिंचेच्या बिया ) वाटून त्याचा लेप करावा. चिंचेची पाने आणि चिंचेचा गार यांचाही लेप वेदना आणि सूज कमी करणारा आहे.

*काविळी मध्ये खाण्यावरची इच्छा मरून गेली कि रुग्णाला पिकलेली चिंच खायला द्यावी. चिंचेचे सरबत काविळी मध्ये अमृताचे काम करते.

*चिंचेच्या फुलांचा ताजा रस नियमित घेतला तर रक्ती मुळव्याध कमी होतो. पचन शक्ती वाढवून आरोग्यप्राप्ती करून देणारी चिंच खरंच एक स्वस्तातले औषध आहे.

*चिंचेच्या फुलांचा गुलाबाचा गुलकंद बनवतो तशाच पद्धतीने गुलकंद तयार करावा. तो उत्तम पित्तशामक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *