लासलगाव (आसिफ पठाण )
येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना + २ स्तर विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व समुपदेशन करून जागतिक एड्स दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी विज्ञान शाखेचे प्रा.जितेंद्र देवरे हे व्याख्याते म्हणून लाभले. त्यांनी ‘एच. आय. व्ही. व एड्स’ या आजाराची विस्तृत माहिती मुलांना समजावून सांगितली. तरुण-तरुणींच्या मनात असलेल्या प्रश्नांची त्यांनी समाधानकारक व सोप्या भाषेत उत्तरे देत एड्स बद्दल समज-गैरसमज व घ्यावयाची काळजी या संदर्भात आपले विचार मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.किशोर गोसावी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक प्रा.उज्वल शेलार, प्रा.प्रभाकर गांगुर्डे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.सुनिल गायकर यांनी केले तर आभार प्रा.देवेंद्र भांडे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदरावजी होळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रा.से.यो कार्यक्रमाधिकारी आणि रा.से.यो. स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी रा.से.यो. स्वयंसेवक आणि उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थी तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते.
*लासलगाव महाविद्यालयात जागतिक एड्स दिन संपन्न*


























