* ठेकेदारांच्या प्रंलबित बिले आण‍ि आगामी सिंहस्थ कामामध्ये स्थानिक ठेकेदारांना प्राधान्य द्या अन्यथा आंदोलन.*

नाशिक बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया, नाशिक सेंटर चे सर्व सभासद आपणास विनंती करितो की मागील दोन ते तीन वर्षापासून सार्वजनिक बांधकाम विभागातील विविध प्रकारच्या म्हण्जेच ०३,०४ टी-६ नाबार्ड रस्ते व पूल विशेष दुरूस्ती व इमारत दुरूस्तीचे कामे अशा वेगवेगळ्या लेखाशीर्षकांतर्गत आपल्याकडे बिले प्रलंबित आहेत. आम्ही वारंवार आपल्याला लेखी स्वरूपात विनंती केलेली आहे परंतु त्याबाबत आपण कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. आम्ही वांरवार आमचे सर्व सभासद यांची आल्याबरोबर मिटींग घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याबरोबर मिटींग घेऊन सुध्दा कुठल्याही प्रकारचे आमचे विषयी गाऱ्हाणे मांडून सुध्दा आपण दखल घेतलेली नाही.
आत्तापर्यंत आम्ही आपल्याला विनंती करून पैसे येतील अशी अपेक्षा करत होतो परंतु आता ज्या ठेकेदारांनी बँकांकडून कर्ज घेतले आहेत. सोने गहाण ठेवलेले आहेत, नातेवाईकांकडून उसनवार पैसे घेतलेले आहेत ते आता तगादा करून आमच्या घरापर्यंत येऊन आमची प्रॉपर्टी जे आम्ही गहाण केलेले आहेत, तसेच त्याचा लिलाव काढण्याची तयारी चाजू झालेली आहे त्यामुळे आता ठेकेदारांचा संयम सुटत चाललेला आहे. तसेच विभागाने निविदा सादर करताना अनेक मशिनरी ह‍ि स्वत:च्या मालकीची असावी अशी अट विभागाने टाकल्यामुळे जवळपास सर्वच ठेकेदारांनी स्वत:ची मशिनरी बँकाकडून कर्जाऊ खरेदी केल्यामुळे बँकेचा आर्थिक बोजा वाढलेला आहे, त्यातच आमचे महाराष्ट्रातील काही ठेकेदारांनी आत्महत्या केलेली आहे तरिसुध्दा शासन घ्यायला तयार नाही.
मागील विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी शासनाने भरमसाठ कामे वेगवेगळ्या लेखाशीर्षकाखाली काढलेत व सर्व ठेकेदारांनी निवडणुकीच्या आधी स्वत:चे पूर्णपणे भांडवल वापरून अतिशय मनापासून सर्व कामे वेळेच्या आधी पूर्ण केलेत व पैसे मिळतील या शाक्ष्वतीने विभागाकडे ब‍िले सादर केलेले आहेत परंतु सर्वांची निराशा झाली आहे. कुठल्याही ठेकेदाराला चार ते पाच टक्के च्या पुढे पैसे मिळालेले नाहीत त्यामुळे ठेकेदार प्रचंड अडचणीत आलेला आहे व त्याची दखल घ्यायला कोणीही तयार होत नाही त्यामुळे ठेकेदार अतिशय हतबल झालेला आहे त्याचा शासनाने व अधिकाऱ्यांनी अजूनपर्यंत सहानुभूतीपूर्वक विचार केलेला नाही.
तसेच आगामी येऊ घातलेल्या सिंहस्थाची अनेक छोटी छोटी विकास कामे हि आपल्या विभागाकडून एकत्रीकरण करून मोठ्या मोठ्या रकमेच्या निविदा बोलाविल्या आहेत व त्यात सर्वसामान्य ठेकेदार भाग घेऊ शकणार नाही अशा पध्दतीच्या जाचक अटी व शर्ती टाकलेल्या आहेत. त्यामुळे स्थानिक ठेकेदार बेरोजगार झालेला आहे. सर्व ठेकेदारांची अशी भावना आहे कि सिंहस्थ कामांना निधी उपलब्ध असेल तर त्यातून ठप्प झालेले चलन वलन सुरू होऊन थोडाफाार दिलासा मिळेल, परंतु त्यापासून सुध्दा त्यांना वंचित ठेवले जात आहे. साधारण १४०० कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या असून काही ठराविक ठेकेदारांना त्या देण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे. ‍किमान ह्या पुढील निविदांचे एकत्रीकरण न करता स्थानिक ठेकेदारांना प्राधान्य देऊन त्यांना समाविष्ट करण्यात यावे.
याबाबत सर्व ठेकेदारांनी फार मोठ्या प्रमाणात संघटनेकडे आत्महत्या करण्याच्या मानसिकतेत आहे. तरी संघटनेकडून दिनांक १९ आणि २०/०८/२०२५ रोजी आपल्या कार्यालयाबाहेर आंदोलन करावयाचे ठरवले असून दिनांक २१/०८/२०२५ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत त्यावर समाधानकारक तोडगा काढण्याबाबत दखल घ्यावी अन्यथा त्यानंतर सर्व ठेकेदार मिळून सामुहिक आत्मदहन विचारात आहेत. तरी त्यापासून उद्भवणा-या पुढील परिणामास सर्वस्वी आपण जबाबदार असाल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *