सेवाभारती देवगिरी प्रांत जिल्हा बीड व जन शिक्षण संस्थान बीड च्या संयुक्त विद्यमाने माता रमाई नगर खंडेश्वरी परिसर बीड येथे लोक शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती औचित्य साधून ज्यूट बॅग आणि कापडी पिशवी तयार करण्याचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे.
या प्रसंगी सेवा भारती देवगिरी प्रांत सह सचिव डॉ सुभाष जी जोशी, सेवा भारती बीड जिल्हा अध्यक्ष डॉ विनोद जी ओस्तवाल , जन शिक्षण संस्थान बीड चे संचालक श्री गंगाधर जी देशमुख, सहायक कार्यक्रम अधिकारी श्री सुदाम पालकर, सामाजिक कार्यकर्त्या सौ अलका ताई ताकतोडे, सचिव, सेवा भारती बीड महेश कुलकर्णी,कोष रवींद्र फड, सह कोष सुनील कोटेचा, गणेश वाघ सर,डॉ.सौ.संजीवनी ताई कोटेचा,रुग्ण मित्र श्री नारायण पवार,श्री रवींद्र कुलकर्णी सर, सुरभी खोपटीकर, प्रशिक्षक सौ देवशाला घोडके यांच्या बरोबरच प्रशिक्षार्थी व परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सेवाभारती च्या उद्देशिकेस अनुसरून रमाई नगर येथे आठवड्यातून तीन दिवस ओपीडी सुरू करून त्या द्वारे बीड शहरातील नामांकित डॉक्टर्स मंडळी या भागातील लोकांना मोफत आरोग्य विषयक सुविधा देत आहेत.या ओपीडी मुळे अनेक रुग्णांना फायदा होत असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
स्वावलंबन च्या उद्देशाने जन शिक्षण संस्थान बीड च्या सहयोगाने ज्यूट बॅग तयार करण्याचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे.प्रशिक्षण घेतल्यानंतर या लाभार्थ्यांना उद्योग सुरू करण्यासाठी सहकार्य करण्या बद्दल डॉ श्री विनोदजी ओस्तवाल सरांनी सांगितले.
पूनम कानडे यांनी प्रशिक्षण घेऊन कुटुंबास आर्थिक हातभार लाऊन कुटुंब चांगले सुरळीत चालू राहण्यासाठी धडपड करत असल्याचे सांगितले.
अलका ताई ताकतोडे यांनी या भागात सेवा भारती व जन शिक्षण संस्थान बीड द्वारा सुरू असलेल्या कार्यामुळे खरच आमच्या वस्तीतील लोकांचे फायदे झाले असल्याचे सांगितले.
डॉ सुभाष जी जोशी यांनी सेवाभारती,दीनदयाल शोध संस्थान व जन शिक्षण संस्थान द्वारा सुरू असलेल्या कार्याबद्दल माहिती देऊन या ठिकाणी सुरू असलेल्या उपक्रमाचे सर्वांनी फायदे करून घ्यावेत असे सांगितले.प्रशिक्षण घेतल्यानंतर आर्थिक सहकार्य करण्यासाठी शासनाच्या वेगवेगळ्या कर्ज विषयक योजना आहेत.तसेच पूर्णवादी नागरिक सहकारी बँक सुद्धा तुम्हाला सहकार्य करण्यासाठी तयारअसल्याचे सांगितले.
श्री गंगाधर जी देशमुख यांनी जन शिक्षण संस्थान बीड द्वारा जिल्ह्यात स्वावलंबनाची खूप मोठी चळवळ सुरु असून प्रशिक्षणाबरोबरच वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध विषयी जाणीव जागृती करण्याचे कार्य सुद्धा केले जात आहे. प्रशिक्षण घेऊन सर्वांनी आपापले उद्योग सुरू करावेत असे श्री गंगाधर जी देशमुख सर म्हणाले.
सूत्रसंचालन सौ रसिका ताई जोशी यांनी केले,प्रास्ताविक श्री सहायक कार्यक्रम अधिकारी श्री सुदाम पालकर यांनी व्यक्त केले,आभार सौ. सुरभीताई खोपटीकर यांनी केले.
अण्णासाहेब साठे जयंती निमित्त ज्यूट व कापडी पिशवी यशस्वी प्रशिक्षण सुरु विनोद ओस्तवाल






















