आज जि.प.प्रा.शा.पुरी येथे थोर समाजसुधारक लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री मा.मोरे सर व ज्येष्ठ शिक्षक श्री शिंदे सर यांनी सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण
करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाची प्रस्तावना श्री तांबे सर यांनी केली.यावेळी सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.कार्यक्रमानिम्मित शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेत सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला व दोन्ही समाजसुधारकाविषयी आपल्या भाषणात माहीती सांगितली.
त्यानंतर श्रीमती इंगळे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, अध्यक्षीय भाषणात श्री मोरे सर यांनी समाजसुधारक लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी बोलताना म्हणाले, विद्यार्थ्यांनी महापुरुषांची जयंती आणि पुण्यतिथी निमित्ताने त्यांचे स्मरण करून कार्याचे अनुकरण आपल्याही जीवनात करावे, असे आवाहन केले.
शेवटी श्री दारकुंडे सर यांनी आजच्या कार्यक्रमाची सांगता केली.
जिवनमावस. गंगापुर तालुका प्रतिनिधी यांच्याकडून सहयोगी प्रतिनिधी नंदकुमार वाघाडे पाटील अहिल्यानगर






















