पिंपळगाव बसवंत नगरपरिषदेतील सामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजा व विविध समस्यांबाबत आदिवासी उलगुलुन सेना व निर्भय महाराष्ट्र पार्टी तर्फे नगर परिषदेला निवेदन देण्यात आले तसे न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला…

एएचबी टाइम्स ; निफाड तालुका प्रतिनिधी / कृष्णा गायकवाड – पिंपळगाव बसवंत नगर परिषद सफाई कामगार यांनी विविध मागण्यांसाठी निफाड फाटा येथे आंदोलन करण्यात आले याबाबत किमान वेतन, विशेष भत्ता, वेतनातील एकत्रित फरक मिळावा भविष्य निर्वाह निधी मिळावा व कामगारांची सेवा खंडित करू नये तथा तसेच नव्या टेंडर मध्ये कामगारांना घेण्यात यावे अशा विविध मागण्यासाठी पिंपळगाव बसवंत नगर परिषदेच्या सफाई कामगारांनी निफाड फाटा येथे ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले .जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही अशी भूमिका यावेळी आंदोलनकर्त्यांनी घेतली होती. नगरपरिषदेला पत्रव्यवहार करूनही मागण्या मान्य न होत असल्याने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय सफाई कामगार अध्यक्ष राजा गांगुर्डे यांनी घेतला होता निफाड फाटा या ठिकाणी सकाळपासून सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर ज्येष्ठ नेते भास्करराव बनकर यांनी भेट देऊन थोडक्यात माहिती दिली की नगरपरिषद सफाई कामगार युनियन च्या वतीने त्यांच्या काही न्यायिक मागण्यासाठी त्यांनी येथे धरणे धरणाचे कार्यक्रम आयोजित केला होता आयोजन केल्यानंतर पिंपळगाव शहरातील सर्वपक्षीय प्रमुख येथे जमा झाले आहे व त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या आणि मग तहसीलदार साहेब असतील सी ई ओ चौधरी साहेब असतील यांच्याशी आम्ही समन्वय साधून या कर्मचार्‍यांच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी विनंती केली आहे माझ्या सारख्या नागरिकाचे म्हणणे एवढे आहे . नगरपरिषदेत ११ ऑक्टोबर पासून कामगारांना किमान वेतन लागू व्हायला पाहिजे होते दहा महिने कामगारांचे नुकसान झालेले आहे नगर परिषदेचा किमान वेतन आहे १९ हजार १०० आणि ग्रामपालिका असताना किमान वेतन होते १३ हजार ८०० मग आता दहा महिन्यांमध्ये प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दहा महिन्यामध्ये कामगारांचे नुकसान झाल्यामुळे कामगारांना नाईलाजाने आज आंदोलन करावे लागले व आम्ही सर्वपक्षीय नेत्यांनी शासनाशी चर्चा केली . आता एक कमिटी होणार आहे जे काही कंत्राटी लोक आहे आमच्या सर्व युनियनसह सर्वांचे म्हणणे आहे जे तुम्ही लोक भराल हे यातलेच भरले गेले पाहिजे यापेक्षा एकही बाहेरचा कर्मचारी भरला तर आपण नगरपरिषद ला टाळे लावू शकतो याप्रसंगी गणेश बनकर, सतीश मोरे, संतोष सुरवाडकर ,दत्तू मोरे, अमोल बागुल ,राजेंद्र विधाते आणि सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन मध्यस्थी केली आणि नगरपरिषद प्रशासनास मागण्या मान्य करण्यास भाग पाडले यावेळेस भविष्यात नगरपरिषद बाह्य स्तोत्रा द्वारे सफाई कर्मचारी भरणार असेल तर स्थानिकांना पहिले घ्यावा लागेल अन्यथा आम्ही नगरपरिषदेत आंदोलन करू तसेच कार्यालयाला टाळे लावू असा इशारा यावेळेस सर्व पक्ष नेत्याकडून देण्यात आला सर्वपक्षीय नेत्यांनी मध्यस्थ केलेली नगरपरिषदेचे गजानन कराड आणि आदित्य मुरकुटे यांनी कर्मचार्‍यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली प्रशासनाने आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मांगे घेण्यात आले यावेळेस मोठ्या संख्येने सफाई कामगार आंदोलनास सहभागी झाल्याचे बघायला मिळाले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *