बीड प्रतिनिधी (नितीन क्षीरसागर) ।
जन शिक्षण संस्थान ( रे) ही एक कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार द्वारा चालवली जाणारी योजना आहे. संपूर्ण देशात कौशल्य विकासाचे चळवळ गतिमान व्हावी म्हणून २०१८ पासून ( रे ) मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाकडे स्थानांतरित करण्यात आले. जिल्ह्यातील कौशल्य विकासाचा आकृतीबंध तयार करून गरजूंना प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनवण्याचे कार्य जे एस एस च्या माध्यमातून केले जाते. अखिल भारतीय पातळीवर सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणार्या व भारतरत्न नानाजी देशमुख यांनी स्थापन केलेल्या दीनदयाल शोध संस्थान च्या सहकार्याने ही योजना बीड जिल्ह्यात कौशल्य प्रशिक्षण देण्याचे कार्य करत आहे.
उद्दिष्ट्ये : प्रशिक्षण तुमच्या दारी या ब्रीद वाक्याला अनुसरून बीड व
शहरी भागासह ग्रामीण भाग, वाडी, वस्ती ,तांडे इत्यादी ठिकाणी निरक्षर, नवसाक्षर , प्राथमिक स्वरूपाचे शिक्षण घेतलेले,१२ वी पर्यंत शिक्षण घेऊन पुढे न शिकलेल्या युवक युवतींचा किमान २० लोकांचा गट तयार झाल्यास त्यांच्या मागणीनुसार त्यांच्या परिसरातच प्रशिक्षण दिले जाते.
जिल्ह्यात आधुनिक कौशल्य विकासाच्या माध्यमातून पिढीजात कौशल्याची ओळख निर्माण करणे.
कौशल्य विषयक कार्यशाळेच्या माध्यमातून विविध विभागात काम करणार्या तज्ञ प्रशिक्षकांची फळी निर्माण करणे.
कौशल्य विषयक काम करणार्या अन्य संस्थान सोबत सहकार्य व समन्वय साधणे.
राष्ट्रीय मूल्यांचे संवर्धन करून राष्ट्रीय कार्यक्रमांचे आयोजन करणे.
स्वयंरोजगार वाढीच्या दृष्टीने वित्तीय संस्था व लक्षित समूह यांच्यात समन्वय साधून अर्थसाह्य करण्यासाठी मदत करणे.
वैशिष्ट्ये:-
ए.ण्,ए.ऊ,दिव्यांग,विधवा, परित्याकत्या यांना निःशुल्क प्रशिक्षण. इतरांना नाममात्र शुल्क.
बचत व आर्थिक व्यवहाराची माहिती व बचत गट निर्माण करण्यास प्रेरित करणे.
उपजीविका केंद्र ( थ्ग्नत्ग्प्दद् णहूी )
जन शिक्षण संस्थान बीड द्वारा भारतरत्न नानाजी देशमुख उपजीविका केंद्र कार्यान्वित आहे या उपजीविका केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींसाठी व्यवसाय उभारणीसाठी मार्गदर्शन केले जाते. यामध्ये बँकेत खाते खोलणे, बचत करणे, बचत गट स्थापन करणे, बँकांच्या विविध कर्ज योजनेची माहिती देणे, बँकांसोबत कर्ज मिळावे आयोजित करणे, पंतप्रधान मुद्रा लोन योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना, याविषयीची माहिती संबंधित तज्ञ व्यक्तींद्वारे दिली जाते.
या उपजीविका केंद्राचा मुख्य उद्देश लाभार्थींना या योजनेचा लाभ देऊन बँकांद्वारे भांडवल उभारणी करून आपला व्यवसाय चालू करावा हा आहे.
उपजीविका केंद्र अंतर्गत : साडी पेटिकोट निर्मिती उद्योग, प्रिâज कव्हर, किचन एप्रन, ज्यूट बॅग, कापडी बॅग, फोल्डर फाईल, बेबी किट निर्मिती उद्योग, तसेच सहा बचत गटाच्या माध्यमातून व्यवहार सुरू आहेत.
प्रशिक्षण घेतलेल्या अनेक लाभार्थ्यांना मुद्रा योजना , मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना या अंतर्गत अर्थसहाय्य मिळाले आहेत.
पी एम विश्वकर्मा योजना : मागील वर्षे पासून पीएम विश्वकर्मा ही योजना जन शिक्षण संस्थान बीडच्या माध्यमातून जिल्ह्यातील पारंपारिक कारागिरांच्या सक्षमीकरणासाठी राबवली जात आहे. आत्तापर्यंत कुंभार, सुतार, न्हावी, माळी व टेलर या विषयांच्या १०१० कारागिरांना सहा दिवसाचे प्रशिक्षण दिले आहे. त्या सर्वांनाच प्रत्येकी चार हजार रुपये मिळाले असून ९० टक्के कारागिरांना पंधरा हजार रुपयाची किट मिळाल्या आहेत. ५३० कारागिरांना बँक द्वारा पाच टक्के व्याजदराने एक लाख रुपयाचे अर्थसहाय्य प्राप्त झाले आहे. प्रशिक्षण दरम्यान मिळालेल्या मार्गदर्शनाने आणि प्रभावित होऊन १६ लोक व्यसनमुक्त झाले आहेत. विश्वकर्मा योजनेअंतर्गत घेतलेले सर्वच प्रशिक्षणार्थी जन शिक्षण संस्थानशी परिवारासारखे जोडले गेले आहेत.
जिल्ह्यात पीएम विश्वकर्मा योजनेचे १८ प्रशिक्षण केंद्र असून त्यापैकी जन शिक्षण संस्थान बीड द्वारा सुरू असलेले पी.एम. विश्वकर्मा प्रशिक्षण केंद्र हे अव्वल दर्जाचे असल्याचे जिल्हा समन्वयक यांनी अनेक ठिकाणी जाहीरपणे सांगून कार्याचे कौतुक केले आहे.
विशेष उपलब्धी :- स्किल हब योजनेअंतर्गत देशभरातील ३०४ जन शिक्षण संस्थानपैकी पहिल्या टप्प्यात पहिल्या पन्नास मध्ये जन शिक्षण संस्थान बीडला असिस्टंट ब्युटी थेरपीस्ट व सिविंग मशीन ऑपरेटर या प्रशिक्षणाची मान्यता मिळून ११२ प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
२००४ पासून आज पर्यंत ४४५०० लोकांनी वेगवेगळे प्रशिक्षण घेतले आहेत.
संकल्प प्रकल्प अंतर्गत देशातील ३० जन शिक्षण संस्थान मध्ये बीडला संगणक प्रशिक्षणासाठी अद्यावत लॅब मिळाली आहे.
जन शिक्षण संस्थान बीड ला अशा प्रकारच्या कौशल्य विषयक प्रशिक्षणामुळे अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
पीएम विश्वकर्मा योजनेचे जिल्हाभरात उत्कृष्ट काम केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्र बीड द्वारा उत्कृष्ट कार्याचा १५ जुलै २०२५ रोजी पुरस्कार प्राप्त झाला आहे.
जन शिक्षण संस्थान बीड ने उभी केली जिल्ह्यात कौशल्य विकासासाची चळवळ






















