मारवाडी युवा मंच मिडटाउन शाखेचा ऐतिहासिक कार्यक्रम
मारवाडी युवा मंच मिडटाउन शाखेच्या एक दिवसीय कार्यक्रमाने समाजसेवा, नेतृत्व आणि संघटनात्मक बांधणीला एक नवीन उंची दिली. हा कार्यक्रम तीन प्रमुख टप्प्यांमध्ये आयोजित करण्यात आला, ज्यामध्ये सेवा, सन्मान आणि नवचेतनेचा समावेश होता.चिकलठाणा गोशाळा, छत्रपती संभाजीनगर येथे सकाळी चारा दान, गूळ व गो-खाद्याने तुलादानाचे आयोजन करण्यात आले. मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेशजी जैन (तेलंगणा) आणि महाराष्ट्र प्रदेशाच्या प्रथम महिला अध्यक्ष आ. अमृता भूतडा (नाशिक) यांच्या प्रेरणादायक उपस्थितीमुळे कार्यक्रमाला एक विशेष महत्त्व प्राप्त झाले.मारवाडी युवा मंच मिडटाउन शाखेने आतापर्यंत ४८० हून अधिक समाजोपयोगी सेवा प्रकल्प राबवले असून, हा कार्यक्रम त्यात आणखी एक सुवर्णपान ठरला.आणखी एक ऐतिहासिक टप्पा म्हणून आ. अमृता भूतडा आणि सुरेशजी जैन यांच्या नेतृत्वाखाली वार्षिक सभा आणि नवीन कार्यकारिणीची पदग्रहण सोहळा पार पडला.कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि मंगलाचरणाने झाली. निवर्तमान कार्यकारिणीने वर्षभरातील कार्य, आर्थिक अहवाल आणि सेवा प्रकल्पांचे सादरीकरण केले.या सोहळ्यात छत्रपती संभाजीनगरच्या विविध संस्थांनी सामूहिकरित्या सन्मान केला, आणि नविन कार्यकारिणीने सेवा, समर्पण आणि निष्ठेची शपथ घेतली.
संभाजी नगर मिडटाउनच्या संस्थापिका अध्यक्ष सुप्रिया सुराना,
जोनल उपाध्यक्ष मीनल चेचानी
यांचे योगदान महत्वाचे ठराले। मारवाडी युवा मंचच्या महाराष्ट्र प्रादेशिक कार्यकारिणीची पहिली सभा ‘युवा तरंग’ या उत्साही वातावरणात पार पडली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाज प्रतिष्ठित रेखा राठी, सुनील मालपानी, नितीन चेचानी आणि पदमसिंह राजपुरोहित यांचा मोलाचा सहभाग होता.अशाप्रकारे, मारवाडी युवा मंच मिडटाउन शाखेने एक ऐतिहासिक व प्रेरणादायक कार्यक्रम साकारला ज्यामुळे समाजसेवा आणि नेतृत्वाच्या नवनवीन गगनाला स्पर्श केला.






















