नाशिक जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पश्चिम विभागाचे वनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, उपजिल्हाधिकारी सीमा हिरे (रोहयो) आदींसह स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते विविध ठिकाणी वृक्षारोपण






















