चांदवड (कीर्ती गुजराथी) –
तालुक्यातील कुंदलगाव शिवारात मनमाड-मालेगाव रोडच्या बाजूला भालनोर माथ्यावर अंदाजे ३५ ते ४० वर्षीय अनोळखी व्यक्ती बेशुद्धावस्थेत आढळून आला. त्याला खासगी रुग्णवाहिकेने चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी तपासून त्यास मयत घोषीत केले. मृताची ओळख पटली नाही. रंग सावळा, चेहरा उभट, नाक सरळ, उंची पाच फूट २ इंच, अंगात निळसर रंगाची फूल पॅन्ट व चॉकलेटी रंगाची अंडरवेअर असे त्याचे वर्णन आहे. याबाबतची खबर कुंदलगावचे सेवानिवृत्त पोलीस पाटील कारभारी कडनोर यांनी चांदवड पोलीसांना दिली. याबाबत पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास पोलीस हवालदार राजू गायकवाड करीत आहेत.
——

























