लासलगाव येथे विद्यार्थ्यांसाठी ‘प्रज्ञा योग’ शिबिराचा उत्साहात समारोप

लासलगाव (वार्ताहर) श्री श्री रविशंकर जी प्रणित आर्ट ऑफ लिविंग संस्थेच्या वतीने लासलगाव (ता निफाड) येथे आठ ते अठरा वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘अंतर्ज्ञान प्रक्रिया’ (प्रज्ञा योग) शिबिराचा नुकताच उत्साहात समारोप झाला
प्रशिक्षण क्षेत्रात २७ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले प्रशिक्षक सचिन म्हसने (नाशिक) आणि बाळासाहेब कदम (लासलगाव) यांनी या शिबिरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
हे शिबिर ८ ते १३ आणि १३ ते १८ या दोन वयोगटांसाठी चार दिवस ऑफलाईन आणि सात दिवस ऑनलाईन अशा दोन सत्रात घेण्यात आले शिबिरामध्ये आंतरज्ञान प्रक्रियेसोबतच सुदर्शन क्रिया विविध प्राणायाम ध्यान तसेच बौद्धिक व मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले
या शिबिरामुळे मुलांच्या शारीरिक मानसिक व बौद्धिक स्तरावर उल्लेखनीय सकारात्मक परिणाम झाल्याचे पालकांनी सांगितले
शिबिर यशस्वी करण्यासाठी आर्ट ऑफ लिविंगचे प्रशिक्षक किशोर पाटील मनीषा घोडके संस्कार टीचर रोहिणी जाधव मनोहर जाधव पंकज सोनवणे कैलास वाघ विजय आवारे विठ्ठल पवार रविराज शिंदे आणि राजेंद्र चांदे यांनी विशेष परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *